ट्रम्प-मोदींची 'फोन पे चर्चा', मोदींना अमेरिकेत येण्याचं आमंत्रण
By admin | Published: January 25, 2017 06:14 AM2017-01-25T06:14:14+5:302017-01-25T06:43:44+5:30
भारत खरा मित्र असल्याचं म्हणत ट्रम्प यांनी मोदींना अमेरिकेत येण्याचं निमंत्रण दिलं. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, दहशतवाद आणि सुरक्षा या विषयांवर
ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 25 - अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून चर्चा केली. भारत खरा मित्र असल्याचं म्हणत ट्रम्प यांनी मोदींना यावर्षी अमेरिकेत येण्याचं आमंत्रण दिलं. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार, दहशतवाद आणि सुरक्षा या विषयांवर चर्चा झाल्याचं व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलं आहे.
जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी अमेरिका भारताला महत्वाचा सहकारी आणि मित्र समजतो असं ट्रम्प म्हणाले. याशिवाय दक्षिण आशिया आणि मध्य आशियाच्या सुरक्षेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. तसेच, दहशतवादाविरोधात लढण्याचाही दोन्ही नेत्यांनी संकल्प केल्याचं वृत्त आहे.
विशेष म्हणजे अमेरिकेचे 45 वे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ट्रम्प यांनी स्वतःहून फोन लावून चर्चा केलेले मोदी हे जगातील पाचवे नेते ठरले. यापुर्वी ट्रम्प यांनी कॅनडा, मॅक्सिको, इस्त्राइल आणि मिस्त्र या देशांच्या प्रमुखांसोबत फोनवर संवाद साधला होता.
President #DonaldTrump invites Prime Minister #NarendraModi to visit #US later this year.
— Press Trust of India (@PTI_News) January 24, 2017
US President #DonaldTrump speaks to PM @narendramodi over phone: White House.
— Press Trust of India (@PTI_News) January 24, 2017