ट्रम्प यांचा दौरा आणि आपचा ‘हॅप्पीनेस क्लास’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 01:52 AM2020-02-24T01:52:17+5:302020-02-24T01:52:31+5:30

केजरीवालांना वगळल्यानंतर बचावात्मक पवित्रा

Trump's Tour and Your 'Happiness Class' | ट्रम्प यांचा दौरा आणि आपचा ‘हॅप्पीनेस क्लास’

ट्रम्प यांचा दौरा आणि आपचा ‘हॅप्पीनेस क्लास’

googlenewsNext

नवी दिल्ली : मेलानिया ट्रम्प यांच्या शाळा भेटीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची नावे वगळल्याप्रकरणी आपने आक्रमक न होता बचावात्मक धोरण स्वीकारले आहे. याबाबत उघडपणे काहीही न बोलण्याचे निश्चित करतानाच केवळ कामकाजावर लक्ष्य केंद्रित करण्याचा पवित्रा आपने घेतला आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प या दिल्लीतील सरकारी शाळांमधील हॅप्पिनेस क्लासची दखल घेऊन भेट देणार आहेत. त्यांच्या या भेटीवेळी या संकल्पनेची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया उपस्थित राहतील, अशी माहिती देण्यात आली. मात्र, दोघांची नावे भेटीतून वगळण्यात आल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी उघडपणे काहीही न बोलण्याचे धोरण आम आदमी पार्टीने स्विकारले आहे.

सर्वसाधारणपणे अशावेळी टीका आणि विविध प्रकारचे वक्तव्य केले जाते. मात्र, यापुढे वायफळ गप्पा, टीका, टिपण्णी आणि अन्य बाबींना महत्त्व देण्यापेक्षा कामाचेच बोलायचे, आरोप किंवा अन्य बाबी करायच्या नाहीत, असे केजरीवाल यांनी नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचे समजते. आताही याप्रकरणी माध्यमांनी विचारले असता सिसोदिया आणि गोपाल राय यांनी काहीही न बोलणेच पसंत केले आहे.

आपच्यावतीने केजरीवाल यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. सिसोदिया यांना मॉस्कोचे निमंत्रण होते. त्यावेळी त्यांना परवानगी नाकारण्यात आली होती. त्यावर बोलतानाचा हा व्हिडिओ आहे. जाण्याची परवानगी द्या किंवा नका देऊ पण चर्चा तर आमचीच होत असल्याचे वक्तव्य केजरीवाल यांनी केले होते. आताही भेटीतून नावे वगळली असली तरी चर्चा केवळ आमचीच होत असल्याचा संदेश यातून देण्यात येत आहे. सिसोदिया यांनीही एका टविटमध्ये थेट उल्लेख न करता या क्लासद्वारे कशाप्रकारे शिकवण दिली जात आहे, एवढेच म्हटले आहे. त्यामुळे आपची रणनिती बदलली असून यापुढे केवळ विकासाचेच राजकारण करण्याचे आणि परिपक्वतेचे दर्शन घडविण्याचे निश्चित झाले असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Trump's Tour and Your 'Happiness Class'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.