चहावाल्याची सच्चाई; व्यापाऱ्याचे 50 हजार हसतमुखाने परत केले, वर चहाही पाजला!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 12:27 PM2018-10-17T12:27:57+5:302018-10-17T12:32:48+5:30
सोमवारी दुपारनंतर बर्रा येथील व्यापारी अभिषेक हे नयागंज येथील लाल फाटकस्थित बाजारात खेरदी करण्यासाठी गेले होते. लाल फाटकच्या बाहेर आपली स्कुटी उभी करुन ते आत शिरले.
कानपूर - येथील एका चहावाल्याच्या प्रामाणिकपणा पाहून एक व्यापारी गहिवरला. कारण, दिवसाला 300 रुपये कमावणाऱ्या या चहावाल्यास सापडलेले 50 हजार रुपये त्याने संबंधित व्यापाऱ्याला परत केले होते. रमेश कुमार असे या चहावाल्याचे नाव असून नायगंज येथील एका बाजारात ते चहाचे दुकान लावतात. विशेष म्हणजे 50 हजार रुपये दिल्यानंतर, आपल्याच दुकानातील चहा पाजून रमेश कुमार यांनी व्यापाऱ्याला निरोप दिला.
सोमवारी दुपारनंतर बर्रा येथील व्यापारी अभिषेक हे नयागंज येथील लाल फाटकस्थित बाजारात खेरदी करण्यासाठी गेले होते. लाल फाटकच्या बाहेर आपली स्कुटी उभी करुन ते आत शिरले. त्यावेळी त्यांच्याजवळील 500 रुपयांच्या नोटांचा बंडल खाली पडला. ही बाब त्यांच्या लक्षातच आली नाही. शेजारीत चहाचं दुकान चालवणाऱ्या रमेश कुमार यांना हा नोटांचा बंडल मिळाला. रमेश कुमार यांनी तो बंडल आपल्याजवळच ठेऊन घेतला. दरम्यान, थोड्याच वेळात अभिषेक बदहवास रमेश कुमार यांच्या चहाच्या टपरीजवळ परतले. त्याजागी ते काहीतरी शोधत असल्याचे रमेश कुमार यांनी पाहिले. त्यामुळे, काय झाले ? असा प्रश्न रमेश कुमार यांनी अभिषेक यांना विचारला. पैसे हरवल्यामुळे निराश झालेल्या अभिषेक यांनी नाराजीच्या सुरातच 50 हजारांचा बंडल येथे पडला, खरेदी करण्यासाठी आलो होतो, असे सांगितले. त्यावर, रमेश कुमार यांनी प्रतिप्रश्न करत, किती रुपयांच्या आणि किती नोटा होत्या. रमेश यांच्या प्रश्नावर अभिषेक यांनी 500 रुपयांच्या नोटा होत्या, हे उत्तर देतात खात्री होताच रमेश कुमार यांनी 50 हजारांचा बंडल अभिषेक यांच्या हातात ठेवला. एकवेळ तर अभिषेक यांना विश्वासच बसला नाही, की त्यांना त्यांचे हरवलेले पैस परत मिळाले आहेत. त्यानंतर, अभिषेक यांनी आग्रह करत 1 हजार रुपयांचे बक्षीस रमेश कुमार यांना दिले. तर रमेश कुमार यांनीही 50 हजारांसह चहा पाजून अभिषेक यांना निरोप दिला.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी बाजारात ही वार्ता कळताच, बाजारातील व्यापाऱ्यांनी प्रामाणिकपणाबद्दल त्या चहावाल्याचा सत्कार केला.