पोलिसांच्या अंगावर टॅँकर घालण्याचा प्रयत्न! मद्यधुंद चालकाचा पराक्रम : पाठलाग करून आकाशवाणी चौकात पकडले

By admin | Published: March 22, 2016 12:41 AM2016-03-22T00:41:19+5:302016-03-22T00:41:19+5:30

जळगाव : एरंडोलकडून भरधाव वेगात भुसावळकडे जाणारा रसायनाने भरलेला टॅँकर मद्यधुंद चालकाने कर्तव्यावरील वाहतूक पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी रात्री ८.३० ते ९ वाजेदरम्यान महामार्गावर प्रभात चौकाजवळ घडली. या प्रकारानंतर टॅँकर चालकाने घटनास्थळावरून टॅँकरसह पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला आकाशवाणी चौकात पकडले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Try to add tanker to police! Power of drunk driver: After chasing, the airplane caught in the chowk | पोलिसांच्या अंगावर टॅँकर घालण्याचा प्रयत्न! मद्यधुंद चालकाचा पराक्रम : पाठलाग करून आकाशवाणी चौकात पकडले

पोलिसांच्या अंगावर टॅँकर घालण्याचा प्रयत्न! मद्यधुंद चालकाचा पराक्रम : पाठलाग करून आकाशवाणी चौकात पकडले

Next
गाव : एरंडोलकडून भरधाव वेगात भुसावळकडे जाणारा रसायनाने भरलेला टॅँकर मद्यधुंद चालकाने कर्तव्यावरील वाहतूक पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी रात्री ८.३० ते ९ वाजेदरम्यान महामार्गावर प्रभात चौकाजवळ घडली. या प्रकारानंतर टॅँकर चालकाने घटनास्थळावरून टॅँकरसह पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला आकाशवाणी चौकात पकडले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डिगंबर पाटील (३५, रा.धुळे) हा (एमएच १८ एए ९७३९) क्रमांकाचा रसायनाने भरलेला टॅँकर धुळ्याहून भुसावळकडे घेऊन जात होता. वाटेतच डिगंबरने यथेच्छ मद्यप्राशन केल्याने तो टॅँकर सुसाट वेगात नेत होता. बांभोरी गावापासून काही अंतरावर त्याने एका बोलेरो कारला मागून धडक दिली. त्यानंतरही त्याने टॅँकरचा वेग कमी केला नाही. समोरून येणार्‍या व पुढे चालणार्‍या वाहनांना कट मारत तो धोकादायक पद्धतीने टॅँकर चालवत होता. या प्रकारामुळे भीषण अपघात होऊ शकतो, म्हणून काही सूज्ञ नागरिकांनी दुचाकीवर त्याच्या पुढे येऊन प्रभात चौकात महामार्गावर कर्तव्यावर असणार्‍या वाहतूक पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. म्हणून पोलीस टॅँकर चालकाला अडवण्यासाठी रस्त्याजवळ थांबलेले होते. सुसाट वेगात येणारा टॅँकर पाहून पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने सरळ पोलिसांच्या दिशेने टॅँकर आणला. टॅँकर न थांबताच पुढे गेल्याने प्रभात चौकातील पोलिसांनी वायरलेसवरून घटनेची माहिती पुढे कळवली.
आकाशवाणी चौकात लागला हाती
वायरलेसवरून घटनेची माहिती मिळताच वेगवेगळ्या पाइंटवर असणारे पांडुरंग पाटील, शेषराव राठोड, विनोद चव्हाण, योगेश पवार, नीलेश झोपे या पोलीस कर्मचार्‍यांनी टॅँकरचा पाठलाग करून त्याला आकाशवाणी चौकात अडवले. त्यानंतर चालक डिगंबर पाटील याला ताब्यात घेण्यात आले. या घटनेनंतर टॅँकरसह त्याला वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले. पोलिसांनी त्याला माहिती विचारली असता तो उडवा-उडवीची उत्तरे देत होता. मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याला उभेदेखील राहता येत नव्हते.
ब्रेथ ॲनालायझर टेस्ट
वाहतूक शाखेच्या कार्यालयात डिगंबरची बे्रथ ॲनालायझर टेस्ट (अल्कोहोल चाचणी) करण्यात आली. ती पॉझिटीव्ह आल्याने त्याच्यावर ड्रंक ॲण्ड ड्राइव्हचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Try to add tanker to police! Power of drunk driver: After chasing, the airplane caught in the chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.