मधुमेहाला आताच रोखण्याचा प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2016 02:32 AM2016-03-30T02:32:20+5:302016-03-30T02:32:20+5:30

जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मधुमेहाला रोखण्यासाठी आतापासनच प्रयत्न करावेत, अन्यथा २0३0 सालपर्यंत हा सातवा मोठा मनुष्यहानी घडवून आणणारा आजार ठरू शकेल

Try to prevent diabetes just now | मधुमेहाला आताच रोखण्याचा प्रयत्न करा

मधुमेहाला आताच रोखण्याचा प्रयत्न करा

googlenewsNext

नवी दिल्ली : जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मधुमेहाला रोखण्यासाठी आतापासनच प्रयत्न करावेत, अन्यथा २0३0 सालपर्यंत हा सातवा मोठा मनुष्यहानी घडवून आणणारा आजार ठरू शकेल, असे इशारावजा आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने (वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन-व्हू) ने भारतासह सर्व दक्षिण आशियाई देशांना केले आहे. जागतिक आरोग्य दिन ७ एप्रिल रोजी आहे.
मधुमेहाला रोखण्यासाठी लहान मुलांच्या खाद्यपदार्थांचेही नियमन करण्यात यावे, तसे केल्यास मुलांसाठीचे खाद्यपदार्थ विकत घेताना ते मधुमेहास पूरक आहेत वा नाहीत, हे ग्राहकांना कळू शकेल. मधुमेह ही हल्ली मोठी बातमी बनू शकत नाही. पण २0३0 सालपर्यंत याच आजाराने मरण पावणाऱ्यांचे प्रमाण मोठे असेल, हे लक्षात ठेवून शासन यंत्रणा, समाज आणि व्यक्ती या सर्वांनी आतापासूनच काळजी घ्यायला हवी, असे व्हूचे म्हणणे आहे. दर चार व्यक्तींपैकी एकाला मधुमेह असतो आणि त्यातील निम्म्या लोकांना आपणास हा आजार आहे, हेच माहीत नसते. अशा स्थितीत मधुमेह असाच वाढत राहिला तर त्याचे आर्थिक, सामाजिक आणि व्यक्तिगत असे खूपच वाईट परिणाम होतील, असा इशारा व्हूच्या दक्षिण आशियाई विभागाच्या प्रमुख पूनम खेत्रपाल सिंग यांनी दिला आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

शारीरिक हालचाली कमी असणे आणि वजन फारच वाढणे यांमुळे टाइप टू पद्धतीचा मधुमेह होतो. तो टाळणे शक्य असते आणि वेळेत निदान झाल्यास त्यावर उपचारही शक्य आहेत. पण स्वत: काळजी व उपचार न घेतल्यास अवयव वा मज्जासंस्था निकामी होऊ शकते, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि अंधत्वही येते, असे त्यांनी म्हटले आहे.
त्यामुळे नियमित, ठराविक व वेळेवर सकस आहार घेणे, शर्करायुक्त पेये टाळणे गरजेचे आहे. अर्थात हा आहारही गरजेनुसार आणि गरजेइतकाच घ्यावा, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

Web Title: Try to prevent diabetes just now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.