मोदींची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न

By admin | Published: March 20, 2016 04:00 AM2016-03-20T04:00:09+5:302016-03-20T04:00:09+5:30

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक दिल्लीत शनिवारी सुरू असून, पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी सकाळी बैठकीच्या उद्घाटन सत्रात पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा

Trying to change Modi's image | मोदींची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न

मोदींची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न

Next

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक दिल्लीत शनिवारी सुरू असून, पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी सकाळी बैठकीच्या उद्घाटन सत्रात पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतला. आसाममध्ये सत्ता मिळवणे आणि अन्य राज्यांत ताकद वाढवणे यादृष्टीने या बैठकीला महत्त्व आहे.
बैठकीचा समारोप रविवारी पंतप्रधान मोदींच्या भाषणाने होणार होता. मात्र शनिवारी दुपारच्या सत्रानंतर पंतप्रधान अचानक बैठकीला आले. पक्ष बळकट झाला तरच केंद्र आणि राज्यातील सरकारे मजबूत होतील. त्यामुळे संघटना बांधणीला आणि वाढीला प्राधान्य दिले जावे, असे आवाहन त्यांनी केले.
मोदी सरकारचे तिसरे बजेट, आसाम, केरळ, तामिळनाडू, प.बंगाल व पुड्डुचेरी येथील विधानसभा निवडणुका, वर्षभराने उत्तरप्रदेश आणि पंजाबात व्हावयाच्या निवडणुका, राजकीय सद्यस्थिती, पक्षाचे संघटन, जेएनयू प्रकरणानंतर पक्षाची भूमिका, अशा विविध विषयांवर या बैठकीत विचार मंथन होणार आहे. संघटन सचिव रामलाल व महासचिव भूपेंद्र यादव यांनी बैठकीसाठी राजकीय व आर्थिक प्रस्ताव तयार केले आहेत. राजकीय प्रस्तावात पक्षाला अभिप्रेत असलेल्या प्रखर राष्ट्रवादाची झलक आहे तर आर्थिक प्रस्तावात अर्थसंकल्पातील तरतुदींचे समर्थन आहे. ग्रामीण भाग व शेतकऱ्यांविषयी मोदी सरकार किती संवेदनशील आहे, याचा संदेश देशभर गावोगावी पोहोचावा, हा या प्रस्तावांचा उद्देश आहे. जेएनयू आणि भारत माता की जय घोषणेला ओवेसीकृत विरोध प्रकरणानंतर पक्षाला अभिप्रेत राष्ट्रवाद आणि राष्ट्रद्रोह या विषयावरही व्यापक चर्चा बैठकीत होणार आहे. पक्षाध्यक्षपदी अमित शाह यांची निवड झाल्यानंतरची ही पहिलीच बैठक आहे. (विशेष प्रतिनिधी)

भाजपने आसाम व केरळ या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकांवरच अधिक लक्ष केंद्रित केले आहे. बैठकीत या दोन राज्यांच्या रणनीतीवर प्रामुख्याने चर्चा होईल.
परदेश दौरे करून पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय नेत्याच्या भूमिकेत स्वत:ला स्थापित केले. आता ग्रामीण भागाला साद घालत, शेतकरी व दलितांचा नेता अशी नवी प्रतिमा ते बनवू इच्छित आहेत. ‘सूट बूट की सरकार’ या राहुल गांधींच्या टीकेला छेद देणे हा उद्देश तर आहेच, शिवाय पंजाब व उत्तरप्रदेशच्या निवडणुकांसाठीही इमेज मेकओव्हरची मोदींना गरज वाटत आहे. बहुदा त्यामुळेच पंतप्रधानांनी शनिवारी सकाळी या बैठकीला येण्याऐवजी दिल्लीतील कृषी उन्नती मेळ्याला हजेरी लावली.
येत्या दोन महिन्यातही मोदी अधिकांश वेळ शेतकरी व दलितांशी संबंधित कार्यक्रमांमध्ये दिसावेत, याच पद्धतीने देशभर सरकारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ते २१ मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षाशी संबंधित सर्वात मोठ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोपात पंतप्रधानांच्या या बदलत्या प्रतिमेचा प्रभाव पक्षाला व देशाला घडेल, अशी शक्यता आहे.

Web Title: Trying to change Modi's image

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.