'अम्मा'चा आशीर्वाद... रजनीकांत, कमल हसननंतर आता शशिकलांच्या भाच्याचाही राजकीय पक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 11:18 AM2018-03-15T11:18:07+5:302018-03-15T11:18:07+5:30
टीटीव्ही दिनकरन यांनी गेल्याच महिन्यात जयललिता यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आर.के.नगर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता.
मदुराई: शशिकला यांचे भाचे आणि अण्णाद्रमुक पक्षाचे माजी नेते टीटीव्ही दिनकरन यांनी गुरूवारी नव्या पक्षाची घोषणा केली. मदुराई येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. अम्मा मक्कल मुनेत्र कझागम (एएमएमके) असे दिनकरन यांच्या नव्या पक्षाचे नाव आहे. कुकर हे त्यांच्या पक्षाचे चिन्ह आहे. आम्ही नव्या पक्षाच्या नावाने आगामी सर्व निवडणुका लढवू आणि त्यामध्ये विजय प्राप्त करू. तसेच आम्ही निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आलेल्या दोन पानांचे चिन्ह परत मिळावे, यासाठीही प्रयत्न करत आहोत. तोपर्यंत कुकर हेच आपल्या नव्या पक्षाचे चिन्ह असेल, असे दिनकरन यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
टीटीव्ही दिनकरन यांनी गेल्याच महिन्यात जयललिता यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या आर.के.नगर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच दिनकरन यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेते रजनीकांत आणि कमल हसन यांच्या पक्षांचा प्रवेश झाला होता. त्यानंतर आता टीटीव्ही दिनकरन यांच्या नव्या पक्षामुळे तामिळनाडूतील राजकीय परिस्थिती आणखी रंजक झाली आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात. जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूत सातत्याने राजकीय उलथापालथी सुरू आहेत. मध्यंतरी अण्णाद्रमुकमधील के.पलानीस्वामी आणि ओ.पनीरसेल्वम यांच्या गटाने हातमिळवणी केली होती. त्यामुळे तामिळनाडूचे राजकारण सातत्याने दोलायमान राहिले आहे.
#FLASH Amma Makkal Munetra Kazhagam will be the name of my party: TTV Dinakaran. #TamilNadupic.twitter.com/Qj076jOSKx
— ANI (@ANI) March 15, 2018
We will win all upcoming elections from now by using latest name and party flag, we will also try to retrieve the two leaves symbol, till then will use cooker symbol: #TTVDinakaranpic.twitter.com/t042kq9Tp3
— ANI (@ANI) March 15, 2018