क्षयरोग दिन विशेष : क्षयरोगाने मृत्यू होणाऱ्या देशांमध्ये भारताचा पहिला नंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 08:10 PM2019-03-23T20:10:42+5:302019-03-23T20:11:28+5:30

संसर्गजन्य आजारांमध्ये रु ग्णांची वाढती संख्या व गंभीर आजारामुळे ओढवलेला मृत्यू यामध्ये कोणता आजार आघाडीवर

Tuberculosis day special: India's first number of people suffering from tuberculosis | क्षयरोग दिन विशेष : क्षयरोगाने मृत्यू होणाऱ्या देशांमध्ये भारताचा पहिला नंबर

क्षयरोग दिन विशेष : क्षयरोगाने मृत्यू होणाऱ्या देशांमध्ये भारताचा पहिला नंबर

Next

मीरारोड - २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन! क्षयरोगामुळे होणारे मृत्यु आणि रुग्णांच्या संख्येत जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारी नुसार भारताचा पहिला क्रमांक लागत आहे. तर याच आकडेवारीनुसार महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक असल्याची महिती वैद्यकिय क्षेत्रातील मान्यवरांनी दिली आहे. गरीबी, कुपोषण व अस्वछता क्षयरोग वाढण्यास कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

संसर्गजन्य आजारांमध्ये रु ग्णांची वाढती संख्या व गंभीर आजारामुळे ओढवलेला मृत्यू यामध्ये कोणता आजार आघाडीवर असेल तर तो म्हणजे क्षयरोग! जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार आणि विश्व टीबी रिपोर्टच्या आधारानुसार जगातील ६४ टक्के क्षयरोगाचे रु ग्ण हे भारत, इंडोनेशिया, चीन, फिलिपिन्स, नायजेरिया, पाकिस्तान व साऊथ आफ्रीका या सात देशांमध्ये आढळतात. या सात देशां पैकी भारताचा क्र मांक सर्वात वरचा लागतो.

२०१६ साली जगभरात ४ लाख २३ हजार नागरिकांचा मृत्यू क्षयरोगामुळे झाला होता. २०१८ च्या आकडेवारीनुसार देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये २ लाख ५४ हजार ७१७ क्षयग्रस्त होते या राज्यात कानपूर जिल्ह्यात १२ हजार ८६३ क्षयरोगांची संख्या होती.

उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र आणि गुजरातचा नंबर लागतो. महाराष्ट्रात १ लाख ६४ हजार ११३ तर गुजरातमध्ये १ लाख २३ हजार १०१ क्षयरोगग्रस्त आहेत. या शिवाय छोटी खेडी व दुर्गम भागातील क्षयरोगग्रस्तांची संख्या यामध्ये मोजलेली नाही. जगात दर मिनिटाला क्षय रोगामुळे एक व्यक्ती दगावते आणि यामध्ये जागतिक स्तरावर भारत आघाडीवर आहे.

फुफुसरोग तज्ञ डॉ पार्थीव शहा सांगतात की, क्षयरोगाचे जंतू हे अतिसूक्ष्म असून ते क्षयरु ग्णाच्या शिंकण्या, खोकण्या वा थुंकण्यातून हे हवेत मिसळतात व श्वासावाटे इतर व्यक्तींच्या शरीरात शिरतात. आपल्याकडे उघड्यावर थुंकणे सर्वमान्य असल्यामुळे जंतूंचा फैलाव सुलभपणे होतो. क्षयजंतूंचा संसर्ग झाल्यावर क्षयरोगाची लागण त्या व्यक्तीची शारीरिक स्थिती व पोषण यावर अवलंबून असते. रोग प्रतिकारकशक्ती कमी असल्यास क्षयरोग होऊ शकतो.

क्षयरोग झाला की तो लपवण्याची वृत्ती आजही शिक्षित व अशिक्षित नागरिकांमध्ये आढळून येते. सार्वजनिक अस्वच्छता, इतस्तत: थुंकणे, दाटीवाटीच्या वस्तीमुळे घरामध्ये सूर्यप्रकाश न येणे, सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था अशा अनेक बाबी क्षयरोगाच्या समस्येस कारणीभूत आहे.

क्षयरोग वाढणे म्हणजेच त्या देशामध्ये वाढलेली गरिबी, कुपोषण, आर्थिक विषमता, गचाळ औद्योगिकीकरण व शहरीकरण हे मुद्दे अधोरेखित होत असल्याचे ते म्हणाले.

मुंबई, ठाणे आदी मोठया महानगरात देशभरातून आलेले लोक आपल्या सवयी नुसार जगू पाहतात. बकालपणात भर टाकतात. शहरातील श्रीमंत असो की, गरीब कचरा टाकणे, थुंकणे, पान-तंबाखू खाऊन थुंकणे, मद्यपान करणे, धूम्रपान करणे या सगळया गोष्टी राजरोसपणे सार्वजनिक ठिकाणी होत असतात.

मोठ्या शहरांची ही स्थिती आहे तर मग निमशहरी आणि ग्रामीण भागाची स्थिती किती बिकट असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. एक रोगी अनेक जणांना क्षयरोगबाधित करू शकतो, अशी माहिती डॉ अमित थडानी यांनी दिली.

Web Title: Tuberculosis day special: India's first number of people suffering from tuberculosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.