नर्सिंग महाविद्यालयात क्षयरोग जनजागृती

By Admin | Published: March 23, 2017 05:19 PM2017-03-23T17:19:36+5:302017-03-23T17:19:36+5:30

अकोला : जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयाद्वारे जागतिक क्षयरोग दिन सप्ताह साजरा केला जात असून, या सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रम घेतल्या जात आहेत. या अंतर्गत मंगळवार, २१ मार्च रोजी महात्मा फुले नर्सिंग महाविद्यालयात जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. निरपगारे होत्या. याप्रसंगी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. आर. एच. खत्री, वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा गोळे, वसंत उन्हाळे यांनी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. क्षयरोगाची कारणे, लक्षणे, घ्यावयाची काळजी याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थिनींनी क्षयरोग जनजागृतीपर पथनाट्यही सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वसंत उन्हाळे, राहुल गावंडे, जी. एम. धरमकार यांचे सहकार्य लाभले.

Tuberculosis Publicity in Nursing College | नर्सिंग महाविद्यालयात क्षयरोग जनजागृती

नर्सिंग महाविद्यालयात क्षयरोग जनजागृती

googlenewsNext
ोला : जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयाद्वारे जागतिक क्षयरोग दिन सप्ताह साजरा केला जात असून, या सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रम घेतल्या जात आहेत. या अंतर्गत मंगळवार, २१ मार्च रोजी महात्मा फुले नर्सिंग महाविद्यालयात जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. निरपगारे होत्या. याप्रसंगी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. आर. एच. खत्री, वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा गोळे, वसंत उन्हाळे यांनी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. क्षयरोगाची कारणे, लक्षणे, घ्यावयाची काळजी याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थिनींनी क्षयरोग जनजागृतीपर पथनाट्यही सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वसंत उन्हाळे, राहुल गावंडे, जी. एम. धरमकार यांचे सहकार्य लाभले.
23 सीटीसीएल

Web Title: Tuberculosis Publicity in Nursing College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.