तुकडे तुकडे गँग अस्तित्वातच नाही, मोदी सरकारचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 02:34 PM2020-01-21T14:34:40+5:302020-01-21T14:38:07+5:30
गेल्या काही दिवसांपासून तुकडे तुकडे गँगची चर्चा आहे. देशात घडत असलेला हिंसाचार ही तुकडे तुकडे गँग करत असल्याचा अनेक भाजपा नेत्यांचा दावा आहे.
नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून तुकडे तुकडे गँगची चर्चा आहे. देशात घडत असलेला हिंसाचार ही तुकडे तुकडे गँग करत असल्याचा अनेक भाजपा नेत्यांचा दावा आहे. परंतु एका आरटीआय कार्यकर्त्यानं केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तुकडे तुकडे गँगसंदर्भात माहिती मागवली. तर तुकडे तुकडे गँग अस्तित्वातच नसल्याचं माहिती अधिकारातून समोर आलं आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता संकेत गोखले यांनी गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्रालयाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. माहिती अधिकारातून मिळालेलं ते उत्तर गोखले यांनी सार्वजनिक केलं आहे.
साकेत गोखले पोस्टमध्ये लिहितात, तुकडे तुकडे गँग अधिकृतरीत्या अस्तित्वात नाही. ती फक्त अमित शाह यांची एक कल्पना आहे. तुकडे तुकडे गँग हा शब्दप्रयोग बऱ्याचदा उजव्या विचारसरणीचे लोक डाव्या विचारसरणीच्या लोकांवर टीका करण्यासाठी करतात. दिल्ली जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालया(JNU)च्या एका कार्यक्रमात कथित स्वरूपात राष्ट्रविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या, त्यानंतर तुकडे तुकडे गँग हा शब्दप्रयोग सर्रास वापरला जाऊ लागला.
त्याचदरम्यान JNU छात्र संघाचे प्रमुख कन्हैय्या कुमार यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. गेल्या वर्षी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या शब्दाचा प्रयोग केला होता. दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात प्रदर्शन करणाऱ्या लोकांचा उल्लेख तुकडे तुकडे गँग असा करत त्यांना शिक्षा देण्याची वेळ आल्याचं अमित शाह म्हणाले होते. या महिन्याच्या सुरुवातीलाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीतल्या मुख्यमंत्र्यांवर देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप केला होता. जेएनयू कॅम्पसमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून विश्वविद्यालयाला वारंवार टार्गेट करण्यात आलं होतं.PEOPLE - IT'S OFFICIAL
— Saket Gokhale (@SaketGokhale) January 20, 2020
The Home Ministry has responded to my RTI saying:
"Ministry of Home Affairs has no information concerning tukde-tukde gang."
Maanyavar is a liar.
The "tukde tukde gang" does not officially exist & is merely a figment of Amit Shah's imagination. pic.twitter.com/yaUGjrqI4f