'टुकडे-टुकडे गँग'च सरकार चालवतेय : शशी थरूर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 12:02 PM2020-01-22T12:02:50+5:302020-01-22T12:03:48+5:30
एकूणच टुकडे-टुकडे गँगवरून देशातील राजकारण पुन्हा एकदा तापलेलं दिसत आहे. आरटीआय कार्यकर्ते संकेत गोखले यांनी गृहमंत्रालयाकडे टुकडे-टुकडे गँगविषयी माहिती मागवली होती. प्रत्युत्तरात गृहमंत्रालयाने टुकडे-टुकडे गँगविषयी काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले होते.
नवी दिल्ली - माहितीच्या आधिकारात मागवलेल्या माहितीत गृहमंत्रालयाने देशात टुकडे-टुकडे गँग संदर्भात काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. यावर हल्ला करताना शशी थरूर यांनी देशात टुकडे-टुकडे गँग अस्तित्वात असल्याचे सांगत सध्या तेच सरकार चालवत असल्याची टीका मोदी सरकारवर केली.
एका आरटीआय कार्यकर्त्यांने दावा केला होता की, गृहमंत्रालयानेच देशातील टुकडे-टुकडे गँग विषयी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. माध्यमांत आलेली बातमी टॅग करत थरूर म्हणाले की, देशात टुकडे-टुकडे गँगचे अस्तित्व आहे. तिच गँग सरकार चालवत असून देशाची विभागणी करत आहे.
याआधी माजी केंद्रीयमंत्री कपिल सिब्बल यांनी देखील गृहमंत्री अमित शाह यांना टुकडे-टुकडे गँगवरून टोला लगावला होता. गृहमंत्र्यांना टुकडे-टुकडे गँगविषयी आपल्यापेक्षा जास्त माहित आहे. देशालाही ठावूक आहे कोण भारताची विभागणी करू इच्छितं.