बोगद्यात बोगदा अन् १०० मिमीचा पाइप, रेस्क्यू टीमचा नवा प्लॅन; ४० मजूर अजूनही ढिगाऱ्याखालीच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 07:08 AM2023-11-15T07:08:55+5:302023-11-15T07:09:39+5:30

रविवारी पहाटे पाचच्या सुमारास या बोगद्याचा काही भाग कोसळला होता.

Tunnel in tunnel and 100 mm pipe, rescue team's new plan in Uttarkashi Tunnel | बोगद्यात बोगदा अन् १०० मिमीचा पाइप, रेस्क्यू टीमचा नवा प्लॅन; ४० मजूर अजूनही ढिगाऱ्याखालीच

बोगद्यात बोगदा अन् १०० मिमीचा पाइप, रेस्क्यू टीमचा नवा प्लॅन; ४० मजूर अजूनही ढिगाऱ्याखालीच

नवी दिल्ली, डेहराडून: उत्तरकाशी यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्यारापासून डंडालगावपर्यंतच्या बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा (सिलक्याराकडून काही भाग रविवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास कोसळला. दोन दिवसांनंतरही या बोगद्यात ४० मजूर अडकलेले आहेत. या मजुरांना वाचवण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

रविवारी पहाटे पाचच्या सुमारास या बोगद्याचा काही भाग कोसळला होता. यानंतर बोगद्यात अडकून पडलेल्या मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन आरंभले आहे. पोलिस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, आपत्कालीन १०८ आणि राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड (NHIDCL), बोगदा बांधणारी संस्था (NHIDCL) चे कर्मचारीही दिवसरात्र बचावकार्यात व्यस्त आहेत.

बचावकार्यांतर्गत रेस्क्यू टीमने २०० मीटर भागात पडलेला मलबा हटविण्याचे काम सुरू केले आहेत. मजुरांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. बोगद्याला ब्लॉक करणारा सुमारे २१ मीटरचा स्लॅब हटवण्यात आला आहे. आणखी १९ मीटरच्या मार्गातील मलबा उपसण्याचे काम सुरू आहे. मात्र भुसभुशीत मातीमुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. तथापि आता रेस्क्यू टीमने नवी योजना आखली आहे.

सर्व जण सुरक्षित

बोगद्यात अडकून पडलेले सर्व मजूर सुरक्षित आहेत. त्यांना पाइपलाइनद्वारे भोजन व ऑक्सिजन पुरवला जात आहे. वॉकीटॉकीच्या माध्यमातून त्यांच्यासोबत संपर्क केला जात आहेत. बोगद्यात अडकून पडलेले मंजूर प्रामुख्याने बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिसा, उत्तराखंड व हिमाचलचे आहेत.

असे असेल रेस्क्यू ऑपरेशन

  • बोगद्याच्या बाजूला सुरुंग करून त्यात ९०० मिमी व्यासाचे पाइप टाकण्याची प्रक्रिया सुरू केली. यामुळे बोगद्याच्या अडकलेल्या भागात आडवे ड्रिलिंग केले जाईल.
  • आगर मशीनद्वारे ९०० मिमी रुंद पाईप टाकण्याचे युद्धस्तरावर प्रयत्न सुरु आहेत.
  • पाईप ढिगायाच्या आत सोडून यातून मजुरांना बाहेर काढले जाणार आहे.
  • बोगद्यात पडलेल्या ढिगाच्यातून पाईप आडवे सोडण्यासाठी तयारी केली जात आहे.
  • यासाठी ड्रिलिंग मशिनच्या माध्यमातून छिद्र पाडले जाईल. पाईप आतमध्ये पोहोचल्यास याच्यामधून मजूर बाहेर येऊ शकतील. यासाठी बचावपथक रात्रंदिवस काम करत आहे.

 

Web Title: Tunnel in tunnel and 100 mm pipe, rescue team's new plan in Uttarkashi Tunnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :delhiदिल्ली