जम्मूतील बोगदा घुसखोरीसाठीच

By admin | Published: September 3, 2014 01:45 AM2014-09-03T01:45:43+5:302014-09-03T01:45:43+5:30

गेल्या आठवडय़ात जम्मूत भारत-पाक सीमेवर आढळलेला बोगदा दहशतवाद्यांच्या घुसखोरीस असल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे.

The tunnel in Jammu is for infiltration | जम्मूतील बोगदा घुसखोरीसाठीच

जम्मूतील बोगदा घुसखोरीसाठीच

Next
जम्मू : गेल्या आठवडय़ात जम्मूत भारत-पाक सीमेवर आढळलेला बोगदा दहशतवाद्यांच्या घुसखोरीस असल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे. जम्मूमधील संवेदनशील भागात अलीकडे सीमेवर पल्लनवाला सेक्टरमध्ये 15क् मीटर लांब बोगदा खोदल्याचे उघडकीस आले होते.   
जम्मू विभागाच्या नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांची घुसखोरी करण्यात अपयशी ठरल्यानंतर घुसखोरीसाठी एक बोगदा खोदण्यात आला होता. 22 ऑगस्ट 2क्14 ला आढळून आलेल्या या बोगद्याची लांबी नियंत्रण रेषेपासून भारताच्या हद्दीत जवळपास 13क् ते 15क् मीटर होती. हा बोगदा पाकिस्तानमधून सुरू झाला होता. हा बोगदा जमिनीच्या खाली सुमारे 2क् फुटावर होता आणि त्याची उंची चार फूट होती. 
पाकिस्तानातून सुरू झालेला हा बोगदा दहशतवाद्यांना भारताच्या हद्दीत पाठविण्यासाठी आणि त्यांच्यासाठी शस्त्रस्त्र आणि मादक पदार्थाच्या तस्करीसाठी असावा, असा अंदाज उधमपूर येथील उत्तर कमांडच्या मुख्यालयातील एका वरिष्ठ लष्करी अधिका:यांचे म्हणणो आहे. मात्र यासंदर्भात अद्याप कोणताही पुरावा मिळालेला नाही. भारतीय लष्कराच्या दक्ष जवानांनी दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत. (वृत्तसंस्था)

 

Web Title: The tunnel in Jammu is for infiltration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.