आठवडाभरात रेशनवर मिळणार तूरदाळ

By admin | Published: August 1, 2016 11:57 PM2016-08-01T23:57:39+5:302016-08-01T23:57:39+5:30

जळगाव : तुरदाळीच्या किरकोळ दरात होत असलेल्या वाढीमुळे शासनातर्फे अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना १०० रुपये किलो दराने रेशन दुकानावरून तुरदाळ देण्यात येणार आहे. आठवडाभरात ही दाळ रेशन दुकानांवरून वितरित होणार आहे. जिल्‘ातील तीन लाख ५३ हजार ७० कुटुंबांना याचा लाभ होईल.

Turdal will get the ration in the week | आठवडाभरात रेशनवर मिळणार तूरदाळ

आठवडाभरात रेशनवर मिळणार तूरदाळ

Next
गाव : तुरदाळीच्या किरकोळ दरात होत असलेल्या वाढीमुळे शासनातर्फे अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना १०० रुपये किलो दराने रेशन दुकानावरून तुरदाळ देण्यात येणार आहे. आठवडाभरात ही दाळ रेशन दुकानांवरून वितरित होणार आहे. जिल्‘ातील तीन लाख ५३ हजार ७० कुटुंबांना याचा लाभ होईल.
अन्न नागरी पुरवठा विभागातर्फे अंत्योदय व बीपीएल शिधापत्रिकाधारकांना सुरुवातील १२० रुपये किलो दराने ही दाळ उपलब्ध करून देण्यात येणार होती. मात्र १०० रुपयांपेक्षा कमी दराने तुरदाळची विक्री करावी अशी विरोधी पक्षांची मागणी होती. त्यासाठी सोमवार १ ऑगस्ट रोजी मुंबई येथे बैठक सुरु होती. १०० रुपये किलो दराने तूरदाळ रेशनदुकानावरून देण्यात येणार आहे. त्यासाठी मंगळवारी जिल्हानिहाय नियतन मागविण्यात येणार आहे. दाळीचा साठा प्राप्त झाल्यानंतर प्रती कार्ड एक किलो तुरदाळीचे वाटप करण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यातील दोन लाख १५ हजार ७२३ बीपीएल कार्डधारक व एक लाख ३६ हजार ९७७ अंत्योदय कार्डधारकांना लाभ होणार असल्याचे साहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी विलास हरिमकर यांनी सांगितले.

Web Title: Turdal will get the ration in the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.