तुर्कीने नाकारले तर इजिप्तने स्वीकारले; जागतिक बाजारपेठेत भारतीय गव्हाच्या मागणीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 06:34 PM2022-06-15T18:34:04+5:302022-06-15T18:34:18+5:30

Export of Wheat: इजिप्तने भारतीय गव्हाच्या आयातीला मान्यता दिल्यानंतर आता भारताला नवीन परदेशी बाजारपेठ मिळाली आहे. यापूर्वी भारतातील गहू इजिप्तमध्ये निर्यात केला जात नव्हता.

Turkey refused, while Egypt accepted; Increased demand for Indian wheat in the global market | तुर्कीने नाकारले तर इजिप्तने स्वीकारले; जागतिक बाजारपेठेत भारतीय गव्हाच्या मागणीत वाढ

तुर्कीने नाकारले तर इजिप्तने स्वीकारले; जागतिक बाजारपेठेत भारतीय गव्हाच्या मागणीत वाढ

googlenewsNext

Export of Wheat: गेल्या काही वर्षांत भारतात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. भारतात पिकवले जाणारे अन्नधान्य, फळे, भाजीपाला आणि इतर खाद्यपदार्थ परदेशातही निर्यात होतात. रशिया-युक्रेन युद्धाच्या काळातही भारतीय गव्हाच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली. यातच, तुर्कीने भारताचा 55,000 टन गहू खराब असल्याचे कारण देत खरेदी करण्यास नकार दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दुसरीकडे, तुर्कीने गव्हाची खेप नाकारल्यानंतर इजिप्तने हा गहू आयात केला आहे. एवढेच नाही तर इजिप्तने आंतरराष्ट्रीय मानकांच्या आधारे भारतीय गव्हाची चाचणी घेतल्यानंतर त्याच्या गुणवत्तेचे कौतुकही केले.

भारताला नवीन परदेशी बाजारपेठ मिळाली
इजिप्तने भारतीय गव्हाच्या आयातीला मान्यता दिल्यानंतर आता भारताला नवीन परदेशी बाजारपेठ मिळाली आहे. इजिप्त हा आफ्रिकन देश आहे, जिथे भारताने अजून गहू निर्यात केला नव्हता. आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता केल्यानंतर इजिप्त भविष्यातही भारतीय गहू खरेदी करू शकतो. भारतीय गहू खरेदी करण्यापूर्वी अधिकृत इजिप्शियन संघ भारतात आले होते. गहू खरेदीसाठी इजिप्शियन संघाने प्रयोगशाळांमध्ये गव्हाची चाचणी घेतली आणि निकालांवर समाधानी झाल्यानंतर गहू आयात करण्यास मान्यता दिली. यासोबतच गव्हाच्या दर्जेदार उत्पादनासाठी भारताचेही कौतुक करण्यात आले.

भारतीय गहू जगाला आनंद देणारा 
जगभरातील अनेक देश गव्हाच्या आयात-निर्यातीत सर्वोच्च स्थानावर आहेत. ईयू गहू आंतरराष्ट्रीय बाजारात 43 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. तर भारतातील गव्हाची किंमत 26 रुपये प्रति किलो आहे. परवडणाऱ्या दरात चांगल्या प्रतीचा गहू निर्यात करून आता बहुतांश देश भारतातून गहू आयात करत आहेत. युरोपियन युनियनच्या गव्हाच्या तुलनेत भारतीय गहू 17 रुपयांनी स्वस्त आणि चांगला आहे. इतर देश सुद्धा 450-480 डॉलर प्रति टन दराने गहू निर्यात करत आहेत.

मध्य प्रदेशातील गव्हाची मागणी वाढली 
भारतातील बहुतांश राज्यांमध्ये उच्च प्रतीच्या गव्हाची लागवड केली जात असली तरी, इजिप्तला निर्यात होणारा गहू मध्य प्रदेशात घेतला जातो. हा सामान्य गहू नाही, हा गहू मॅकरोनी आणि पास्ता सारख्या विदेशी पदार्थ बनवण्यासाठी वापरला जातो. अन्नधान्याच्या निर्यातीबाबत भारत सरकारने जारी केलेल्या अहवालानुसार, 2021 सालापासून भारतीय गव्हाच्या निर्यातीत पाच पट वाढ झाली आहे. एप्रिल 2022 पर्यंत भारताने आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 14.5 लाख टन गहू विकला आहे. कमी किमतीत चांगली गुणवत्ता पाहता आता अनेक देश भारताकडून गहू खरेदी करू लागले आहेत.

Web Title: Turkey refused, while Egypt accepted; Increased demand for Indian wheat in the global market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.