तुर्कीच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
By admin | Published: July 7, 2015 11:14 PM2015-07-07T23:14:31+5:302015-07-07T23:14:31+5:30
विमानात बॉम्ब असल्याच्या अफवेमुळे बँकॉकवरून इस्तंबूलकडे जाणारे तुर्कीश एअरलाईन्सचे एक विमान मंगळवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्स्थितीत उतरविण्यात आले.
नवी दिल्ली : विमानात बॉम्ब असल्याच्या अफवेमुळे बँकॉकवरून इस्तंबूलकडे जाणारे तुर्कीश एअरलाईन्सचे एक विमान मंगळवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्स्थितीत उतरविण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअरबस-३३० विमान दुपारी १.४५च्या सुमारास दिल्ली विमानतळावर सुरक्षित उतरले. या विमानात १४८ प्रवासी होते. दिल्ली विमानतळावर उतरताच या विमानाला वेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. यानंतर विमानाची कसून तपासणी केली असता, बॉम्बची धमकी अफवा असल्याचे सिद्ध झाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
> दुपारी १.१५ च्या सुमारास विमानातील शौचालयाच्या आरशावर लिपस्टिकने ‘बॉम्ब इन कार्गो’ अशी धमकी लिहिलेली आढळली. विमान कर्मचाऱ्यांच्या नजरेत हा संदेश पडताच खळबळ माजली.
> वैमानिकाने नागपूर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (एटीसी) संपर्क साधत, विमान उतरविण्याची परवानगी देण्याची विनंती केली. तथापि, नागपूर एटीसीने वैमानिकास दिल्ली एटीसीशी संपर्क साधण्यास सांगितले.
> नागपूरला उतरता न आल्याने तुर्कीश विमान दिल्लीकडे वळले आणि दुपारी १.४५च्या सुमारास सुरक्षितरीत्या दिल्ली विमानतळावर उतरले.