आपत्ती व्यवस्थापन विभागातील फोन बंद
By admin | Published: May 12, 2016 10:53 PM2016-05-12T22:53:53+5:302016-05-12T22:53:53+5:30
आपत्ती व्यवस्थापन विभागातील फोन बंद
Next
आ त्ती व्यवस्थापन विभागातील फोन बंदजळगाव - महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील फोन गेल्या पंधरा दिवसांपासून बंद आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा विभाग सुरू करण्यात आला असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत. या संदर्भात या विभागाने आपला अहवालही पाठविला मात्र त्याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. लवादक प्रक्रिया सुरू करण्याचे पत्रजळगाव - हंजीर बायोटेकला मनपाने पत्र देऊन ११ तारखेला आपले म्हणणे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यापूर्वी नोटीस पाठवून २८ मार्च ला हजर रहाण्याचे कळविण्यात आले होते. मात्र या कंपनीकडून प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा नोटीस पाठवून ११ रोजी हजर रहाण्याचे कळविण्यात आले होते. त्यावर आता या कंपनीने मनपास पत्र पाठवून लवादकाची प्रक्रिया सुरू करावी असे कळविले आहे. मनपाने याप्रश्नी एक समिती नेमली आहे मात्र तीचे कामकाज अद्यापही सुरू होऊ शकलेले नाही. पूर नियंत्रण उपायांबाबत मनपास विचारणाजळगाव - शहरात गेल्या पावसाळ्यात पहिल्याच पावसात दाणादाण उडून काही भागात नाल्यांचे पाणी शिरले होते. यावर्षी तशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून महापालिका काय उपाय योजना केली याबाबत विचारणा करणारे पत्र जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी मनपास दिले आहे. नाल्यांवरील अतिक्रमणांबाबतही विचारणा करण्यात आली आहे. यावर येत्या दोन दिवसात मनपाकडून उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. लिफ्टबाबत महापालिकेस सूचनाजळगाव - शासनाच्या यांत्रिक विभागातील लिफ्ट निरीक्षक धांबे यांनी मनपास भेट देऊन लिफ्टबाबत घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर काही सूचना केल्या. मनपाच्या १८ व्या मजल्यावर असलेल्या लिफ्ट कंट्रोल रूममध्ये पोलीस प्रशासनाची वायरलेस यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या फ्रिक्वंसिंचा लिफ्ट यंत्रणेवर परिणाम होऊन भविष्यात दुर्घटना होऊ शकते अशी भीती या अधिकार्याने व्यक्त केली असून या दोन्ही यंत्रणा वेगळ्या कराव्यात अशा सूचना दिल्या आहेत. अपघातग्रस्त तीन क्रमांकाच्या लिफ्टचीही त्यांनी तपासणी करून चाचणी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.