धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीचा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 20:23 IST2019-02-13T20:22:59+5:302019-02-13T20:23:34+5:30
तेलुगू अभिनेत्री एस. नागा झांसी (Naga Jhansi) प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीचा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
हैदराबाद- तेलुगू अभिनेत्री एस. नागा झांसी (Naga Jhansi) प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. अभिनेत्री एस. नागा झांसी हिने प्रियकरानं धोका दिल्यानं आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याची माहिती हैदराबाद पोलिसांनी दिली आहे. अभिनेत्री एस. नागा झांसीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात सूर्या तेजाला अटक करण्यात आली आहे. तसेच न्यायालयात त्याला हजर केले असता, दोन आठवड्यांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
टीव्ही सीरियल पवित्र बंधनमध्ये एस. नागा झांसी हिने काम केलं आहे. नागा झांसी यांचा मृतदेह 5 फेब्रुवारीला घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. अभिनेत्री नागा झांसी ही 21 वर्षांची होती. सहाय्यक पोलीस आयुक्त (पंजागुट्टा) विजय कुमार म्हणाले, नागा झांसीला तिच्या प्रियकरानं आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. त्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरूनच सूर्या तेजाला अटक करण्यात आली आहे.
विजयवाड्यात मोबाइलचं दुकान चालवणारा सूर्या तेजा अभिनेत्री नागा झांसीच्या गेल्या वर्षी संपर्कात आला होता. त्यांच्या मैत्रीचं कालांतरानं प्रेमात रुपांतर झालं. नागा झांसीनं जुलैमध्ये कुटुंबीयांना सांगितलं की, ती तेजाबरोबर लग्न करू इच्छिते. त्यानंतर महिन्याभरासाठी ती तेजाच्या घरीही जाऊन राहिली होती. नोव्हेंबर 2018मध्ये तिने तेजाला वाढदिवसाच्या निमित्तानं नवीन बाइक घेऊन दिली.
गेल्या वर्षी तेजा नागा झांसीच्या घरी गेला आणि त्यानं सांगितलं की, जेव्हा नागा झांसी अभिनय क्षेत्र सोडेल तेव्हाच तिच्याशी लग्न करेन, त्यानंतर झांसीनं ब्यूटी पार्लर चालवण्यास सुरुवात केली. परंतु सूर्या हा नागा झांसीवर संशय घेत होता. तसेच तिला मित्रांबरोबर बोलण्यासही मज्जाव करायचा. गेल्या काही दिवसांपासून तेजानं तिच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली होती. तसेच तिचा फोन कॉलही तो उचलत नव्हता. त्यानंतर नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या नागा झांसीनं आत्महत्या केली.