टीव्ही मालिकांसाठी शोषण होते!
By admin | Published: January 11, 2015 12:30 AM2015-01-11T00:30:11+5:302015-01-11T00:30:11+5:30
‘स्त्री खपाऊ’ झाल्याने टीव्ही मालिकांमध्ये काम मिळविण्यासाठी निर्मात्याकडे ‘अॅट एनी कॉस्ट’ काहीही करेन असा निश्चय करून जे काही घडत आहे
वास्तव : अभिराम भडकमकर यांचा खळबळजनक दावा
नवी दिल्ली : ‘स्त्री खपाऊ’ झाल्याने टीव्ही मालिकांमध्ये काम मिळविण्यासाठी निर्मात्याकडे ‘अॅट एनी कॉस्ट’ काहीही करेन असा निश्चय करून जे काही घडत आहे त्यातील अनेक प्रसंगाचा मी साक्षीदार आहे, असा खळबळजनक दावा प्रसिध्द पटकथाकार अभिराम भडकमकर यांनी केला आहे. चित्रपट अथवा मालिकांमधून काम मिळण्यासाठी शय्यासोबत केली जाते वा करावी लागते का, या वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी या दाव्यातून दिले आहे. भडकमकर यांची ही ‘साक्ष’ मालिकांच्या जगात चर्चेचा विषय ठरू शकते.
राजधानीतील मुक्कामी लोकमतशी बोलताना ते म्हणाले, गेल्या दोन दशकांत टीव्ही मालिकांच्या जगात झालेल्या बदलांचे स्फोटक चित्र म्हणजे पूर्णसत्य आहे. मराठीपेक्षा हिंदी मालिकांसाठी अधिक शोषण होते आहे व त्यासाठी मुली तयार होतात.
ते म्हणाले, ‘दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये काम करणाऱ्या मुलींचा संघर्ष आणि त्या मिषाने होणारे
स्त्रीदेहाचे शोषण हे दाहक सत्य आहे. विक्रीमूल्यच नसेल
तर जगण्यालच अर्थ नाही, असे मानण्याइतपत
घरादारातील वैचारिक स्तर कोसळलाअसून तारतम्य
व मनाला चांगले-वाईट सांगणारा अंत:स्वर हरवत चालल्याने नैतिक व अनैतिक हा फरक उरलेला नाही
आाणि त्याचे दु:ख वाटण्याची संवेदनाही संपली आहे.
माझे शरीर सुंदर आहे, ते लोकाुंढे का आणू नये, हाच प्रश्न मुलांना पडतो व तेथूनच या जगाचा प्रवास सुरू होतो, असेही ते म्हणाले.
अशा शोषणाचे साक्षीदार राहिलेल्या भडकमकर यांनी कधी कायद्याच्या चौकटीचा आधार घेत याबद्दल आवाज का उठविला नाही, वीस वर्षांचा लेखाजोखा आताच का मांडावासा वाटतोय, असे अनेक प्रश्न तूर्तास अनुत्तरीत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)