Aadhaar संबंधित प्रश्न असल्यास आता नो टेन्शन! Tweet करताच मिळणार उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 01:11 PM2020-07-19T13:11:59+5:302020-07-19T14:56:10+5:30

सरकारी योजनांचा फायदा घेताना देखील आधार कार्ड द्यावे लागते. मात्र अनेकदा आधार कार्ड संदर्भात काही प्रश्न असतात मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही. 

tweet uidai for any aadhaar related queries for quick redressal | Aadhaar संबंधित प्रश्न असल्यास आता नो टेन्शन! Tweet करताच मिळणार उत्तर

Aadhaar संबंधित प्रश्न असल्यास आता नो टेन्शन! Tweet करताच मिळणार उत्तर

Next

नवी दिल्ली - आधार कार्ड हे प्रत्येक कामासाठी उपयोगी पडतं. तसेच सरकारी योजनांसोबत ते लिंक करणं गरजेचं झालं आहे. त्यामुळेच त्यावरील माहिती अचूक असणं महत्त्वाचं आहे. सरकारी अथवा खासगी कामांसाठी आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेकदा नाव, पत्ता, फोन नंबर किंवा फोटोबाबत चुका असतात. त्या बदलता येतात. सरकारी योजनांचा फायदा घेताना देखील आधार कार्ड द्यावे लागते. मात्र अनेकदा आधार कार्ड संदर्भात काही प्रश्न असतात मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही. 

आधार कार्ड संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी UIDAI ट्विटर मदत करणार आहे. लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. आधार कार्ड संबंधित एखादी समस्या असेल तर UIDAI च्या अधिकृत ट्विटर हँडलवर प्रश्न विचारून समस्येचं निरसन करू शकता. याकरता आधार कार्डधारक @UIDAI आणि @Aadhaar_Care या ट्विटर अकाउंटवर जाऊन ट्वीट करू शकतात. तसेच आधार केंद्राच्या कार्यालयांची देखील वेगवेगळी ट्विटर हँडल आहेत. त्यावर जाऊन तक्रार करू शकता.

आधारची ही सेवा कस्टमर केअर, फोन नंबर आणि मेल आयडी पेक्षा वेगळी सेवा आहे. 1947 हा UIDAI चा कस्टमर केअर क्रमांक आहे. त्याचप्रमाणे help@uidai.gov.in वर मेल करून देखील तुम्ही आधार संबधित आवश्यक माहिती मिळवू शकता. लोकांची आवश्यकता लक्षात घेता UIDAI ने त्यांच्या विविध सेवा ऑनलाईन सुरू केल्या आहेत. आधार कार्डावरील नावापासून फोन नंबर बदलण्यापर्यंत आणि पत्त्यापासून अन्य काही माहिती बदलण्यापर्यंत अनेक कामं ऑनलाईन करणे शक्य आहे.

आधारकार्डवरील पत्ता बदलणं झालं आता आणखी सोपं, जाणून घ्या कसं

आधारकार्डवरील पत्त्यामध्ये काही चूक असते अथवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास गेल्यास पत्ता बदलण्यासाठी अडचण येते. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही. कारण आधारकार्डवरील पत्ता बदलणं आणखी सोपं झालं आहे. नवीन नियमानुसार आधारकार्डवरील पत्ता बदलणं आधीपेक्षा आता सोपं झालं आहे. यूआयएडीआयकडून सेल्फ डेक्लेरेशन लेटरच्या मदतीने पत्ता बदलला जाईल. यासाठी भाडे करार किंवा इतर कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. ज्या व्यक्तीला पत्ता बदलायचा आहे, त्यांना आधार केंद्रावर जाऊन सेल्फ डेक्लेरेशन फॉर्म द्यावा लागेल आणि तुमचा पत्ता बदलला जाईल. ऑनलाईन आधारकार्डवरील पत्ता कसा बदलायचा हे जाणून घेऊया. 

- सर्वप्रथम यूआयडीएआयची अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in/ वर जा. त्यामध्ये My Adhaar वर क्लिक करा. यामध्ये Udate Your Aadhaar मध्ये जाऊन ड्रॉपडाऊनमधील तिसरा पर्याय Update your address online वर क्लिक करा.  

- क्लिक केल्यावर एक नवीन पेज ओपन होईल. खाली स्क्रोल केल्यानंतर Proceed to Update Address  वर क्लिक करा. यानंतर पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल.

- पेजवर आधी आधार नंबर, कॅप्चा व्हेरिफिकेशन टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करा. आधारसोबत रजिस्टर्ड असलेल्या नंबरवर एक मेसेज येईल. त्यातील कोड घेऊन तो ओटीपीच्या जागी टाका आणि लॉगइन करा.

- पेजवर Update Address via Address Proof, Update Address via Secred Code असे पर्याय दिलेले असतील. Address Proof पर्याय निवडल्यानंतर नवा पत्ता टाका. तसेच योग्य कागदपत्राची स्कॅन कॉपी अपलोड करा. नातेवाईकाचा पत्ता आधार कार्डमध्ये टाकू इच्छित असाल तर त्याच्यासाठी दुसरा पर्याय देण्यात आलेला आहे.

- पर्यायावर क्लिक करून पुढील प्रक्रिया पूर्ण करा. ऑनलाईन व्हेरिफिकेशननंतर आधारकार्डवर पत्ता बदलला जाईल आणि नवीन आधारकार्ड तुमच्या पत्त्यावर पाठवलं जाईल. 

महत्त्वाच्या बातम्या

लखनऊ-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 18 जखमी

CoronaVirus News : मच्छर चावल्याने खरंच कोरोनाची लागण होते?; रिसर्चमधून समोर आली महत्त्वाची माहिती

CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी

'मोदी सरकारच्या भ्याडपणाची मोठी किंमत देशाला मोजावी लागेल'; राहुल गांधींचा हल्लाबोल

"कोरोनापासून बचावासाठी गोमूत्र प्या", भाजपा नेत्याचा अजब सल्ला

CoronaVirus News : चिंता वाढली! कोरोनाग्रस्त चिमुकल्यांमध्ये दिसताहेत 'या' गंभीर आजाराची लक्षणं

Web Title: tweet uidai for any aadhaar related queries for quick redressal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.