'डीअर'वरून स्मृती इराणी-अशोक चौधरी यांच्यात ट्विट युद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2016 08:46 PM2016-06-14T20:46:06+5:302016-06-14T20:55:43+5:30
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी व बिहारचे शिक्षणमंत्री अशोक चौधरी यांच्यात ट्विटरवर 'डीअर' शब्दावरून चांगलेच वाकयुद्ध पेटले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी व बिहारचे शिक्षणमंत्री अशोक चौधरी यांच्यात ट्विटरवर 'डीअर' शब्दावरून चांगलेच वाकयुद्ध पेटले आहे. अशोक चौधरी यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना शिक्षणाच्या नवीन धोरणाबाबत एक ट्विट केले होते. त्यामध्ये त्यांनी डीअर स्मृतीजी असे संबोधित केले होते.
स्मृती इराणी यांनी या ट्विटमध्ये केलेल्या प्रश्नाचे उत्तर तर दिले नाही. परंतु त्यांनी त्यावर रिट्विट करून लिहिले की, अशोक चौधरी तुम्ही महिलांनाही डीअर म्हणून कधीपासून संबोधित करू लागला आहात. त्यानंतर दोघांमध्ये ट्विटरवरच तक्रारी सुरू झाल्या. स्मृती इराणींच्या या प्रत्युत्तरानंतरही अशोक चौधरींनी स्वतःची बाजू लावून धरली. 'अपमानाचा हेतू नाही, मात्र प्रोफेशनल इमेल्स हे डीअर या संबोधनानेच सुरू होतात. कधी तरी मुद्द्यावर उत्तर द्या. नेहमीच इकडे तिकडे भरकटत जाऊ नका,' असं ट्विट केलं.
Dear .@smritiirani Ji are these different from what @AshokChoudhaary Ji said ??? Why the double standard ?? pic.twitter.com/727pxatng8
— SANJEEV SINGH (@SanjeevSinghINC) June 14, 2016
स्मृती इराणी यावरच थांबल्या नाहीत. माझं प्रत्येक संभाषण हे आदरणीय या शब्दाने सुरू होतं, असं लंगडं समर्थन त्यांनी केलं. मात्र, नेटिझन्सवाल्यांना स्मृती इराणींना खुपल्याच. स्मृती इराणी यांनी पूर्वीच्या ट्विट्समध्ये कोणाकोणाला डीअर संबोधलं आहे, डिअर संबोधणे कसं प्रोफेशनल वागणुकीचं लक्षण आहे किंवा पंतप्रधान मोदींनी कशा प्रकारे इतर महिलांना ट्विटमध्ये डीअर संबोधलं आहे, हे ट्विट्स होऊ लागले.
या ट्विटवर स्मृती यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर अशोक चौधरी यांनी उत्तर दिले की, हा अपमानकारक शब्द नाही तर सन्मानार्थ चर्चेच्या सुरुवातीला वापरला जाणारा शब्द आहे. तुम्ही मुख्य मुद्याला गोल-गोल फिरवण्यापेक्षा कधी तरी योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करावा.