कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले, अनेक प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 06:58 AM2019-04-20T06:58:52+5:302019-04-20T07:14:18+5:30
उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले आहे.
कानपूरः उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले आहे. अचानक धावत्या ट्रेनचे 12 डबे घसरल्यानं प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. या अपघातात 100हून अधिक प्रवासी जखमी असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हावडा येथून नवी दिल्लीला जात असलेल्या पूर्वा एक्सप्रेस (12303)ला शुक्रवारी रात्री जवळपास 1 वाजताच्या दरम्यान दुर्घटनाग्रस्त झाली आहे. कानपूरपासून जवळपास 15 किलोमीटर दूरवर असलेल्या रुमा गावाजवळ हा अपघात घडला आहे.
Poorva Express derailment: One National Disaster Response Force (NDRF) team of 45 persons has reached the spot. Rescue operation underway. pic.twitter.com/b69w3AiwnB
— ANI UP (@ANINewsUP) April 19, 2019
कानपूरपासून जवळपास 15 किलोमीटर दूरवर असलेल्या रुमा गावाजवळ हा अपघात घडला आहे. या डब्यामध्ये 8 एसी कोच आणि पेंट्रीचा समावेश आहे. रात्री अडीच 2.30 जिल्हाधिकारी, एसएसपी, 30 अँब्युलन्स, फायर ब्रिगेड आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य राबवलं जात आहे. जखमींना काशीराम ट्रामा सेंटर आणि हॅलट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एनडीआरएफच्या 45 जणांची फौज घटनास्थळी पोहोचली असून, डब्यात अडकलेल्यांना बाहेर काढलं जात आहे. या दुर्घटनेत अद्यापही कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Kanpur: Morning visuals from the spot where 12 coaches of Poorva Express, plying from Howrah to New Delhi, derailed near Rooma village at around 1 am today. No casualties reported. pic.twitter.com/sFw0jZvVib
— ANI UP (@ANINewsUP) April 20, 2019
रेल्वे प्रशासनानं हेल्पलाइन नंबर जारी केला असून, 05122323015 या नंबरवर संपर्क साधण्यास सांगितलं आहे.
Poorva Express derailment in Kanpur: Indian Railways has issued helpline numbers at Howrah- (033) 26402241, 26402242, 26402243, 26413660. pic.twitter.com/J8fMlqIgnb
— ANI UP (@ANINewsUP) April 19, 2019
Latest spot visuals: Total 12 coaches affected due to Poorva Express derailment near Rooma village in Kanpur at around 1 am today. 4 out of 12 coaches had capsized. No casualties reported. pic.twitter.com/u5QsG5Crp2
— ANI UP (@ANINewsUP) April 19, 2019