बारावीत मिळाले 99.99 टक्के, तरीही घेणार संन्यास
By admin | Published: June 7, 2017 09:40 AM2017-06-07T09:40:54+5:302017-06-07T12:49:13+5:30
खादा मुलगा 12 वी सायन्स विभागातून 99.99 टक्के मिळवून पास होतो तरिही करिअरचा विचार न करता तो सन्यास घेतो ही गोष्ट ऐकुन कोणालाही आश्चर्य वाटेलच.
Next
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 7- दहावी आणि बारावीचं वर्ष विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायला मुलं खूप मेहनत घेतात. कारण या मार्कांवरच त्यांच्या करिअरची पुढची दिशा ठरणार असते. पण एखादा मुलगा 12 वी सायन्स विभागातून 99.99 टक्के मिळवून पास होतो तरिही करिअरचा विचार न करता तो संन्यास घेतो ही गोष्ट ऐकुन कोणालाही आश्चर्य वाटेलच. पण असा प्रकार अहमदाबादमध्ये घडला आहे. तेथे राहणाऱ्या 17 वर्षाच्या वर्शील शाह या मुलाने चांगले गुण मिळूनही संन्यास घ्यायचा निर्णय घेतला आहे.
पालकीमध्ये राहणाऱ्या या मुलाने 12 वीची परीक्षा सायन्स विभागातून दिली होती. मेहनतीच्या जोरावर त्याला परीक्षेत 99.99 टक्के मार्क मिळाले. या यशासाठी वर्शीलने त्याच्या आई-वडिलांकडून बक्षीस मागण्याच्या जागी सन्यास घेण्याची परवानगी मागितली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वर्शीलच्या आई-वडिलांना त्याच्या या निर्णयाबद्दल काही पश्चाताप नाही तसंच संपूर्ण परिवार वर्शीलच्या दीक्षा समारंभाची तयारी करतो आहे. 8 जून रोजी सूरतमध्ये त्याचा दीक्षा समारंभा पार पडणार आहे.
वर्शीलचे वडील जिगर शाह आयकर विभागात इंस्पेक्टर पदावर काम करत आहेत. "वर्शीलचा परिवार आधीपासूनच अध्यात्मिक आहे. त्याची आई अती धार्मिक आहे म्हणूनच वर्शील आणि त्याच्या बहिणीला अध्यात्माची आवड असल्याचं, वर्शीलच्या वडिलांनी सांगितलं आहे. वर्शीलला शाळेला सुट्टी असताना तो फिरायला जाण्याऐवजी किर्तनाला जाणं पसंत करायचा. या किर्तनाच्या दरम्यान वर्शीलची अनेक साधू-संत आणि संन्याशी व्यक्तींबरोबर ओळख झाली होती. या सगळ्या व्यक्ती आधी डॉक्टर, इंजिनिअर आणि सीए होत्या पण स्वतःच्या आनंदासाठी त्यांनी सन्यास घेतला होता.
वर्शीलने सन्यासी होण्याच्या या निर्णयावर त्याचे आई-वडील निराश आहेत पण मुलाच्या आनंदासाठी त्यांनी त्याला होकार दिला आहे. वर्शीलने आजपर्यंत आमच्याकडे काहीही मागितलं नव्हतं. पहिल्यांदा काहीतरी मागितलं म्हणून होकार दिला, असं वर्शीलच्या वडिलांनी सांगितलं आहे.