हिमस्खलनात २४ जणांचा मृत्यू

By admin | Published: January 28, 2017 01:01 AM2017-01-28T01:01:28+5:302017-01-28T01:01:36+5:30

जम्मू आणि काश्मिरातील हिमस्खलन बळींची संख्या वाढूून २४ वर पोहोचली असताना जम्मू-श्रीनगर महामार्गावर शुक्रवारीही हिमस्खलन

Twenty-four people die in avalanches | हिमस्खलनात २४ जणांचा मृत्यू

हिमस्खलनात २४ जणांचा मृत्यू

Next

हिमस्खलनात २४ जणांचा मृत्यू
श्रीनगर/बनिहाल : जम्मू आणि काश्मिरातील हिमस्खलन बळींची संख्या वाढूून २४ वर पोहोचली असताना जम्मू-श्रीनगर महामार्गावर शुक्रवारीही हिमस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. आतापर्यंत २0 जण मरण पावल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे.
गुरेझमधील हिमस्खलनानंतर बेपत्ता झालेल्या चार सैनिकांचे मृतदेह आढळून आले. त्यामुळे यात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांची संख्या २४ झाली. गुरेझमध्ये बुधवारी हिमस्खलनाच्या घटना घडून अनेक सैनिक बर्फाखाली दबले होते. सात जणांना गुरुवारी जिवंत बाहेर काढण्यात यश आले. तथापि, १० सैनिकांना वाचविता येऊ शकले नाही. बचाव पथकांना त्यांचे मृतदेहच आढळले.
उरी (जि. बारामुल्ला) भागात हिमस्खलन होऊन फतेह मोहंमद मुघल (६०) यांचा मृत्यू झाला. ते सायंकाळी घराबाहेर पडल्यानंतर हिमस्खलनाच्या तडाख्यात सापडले. पोलीस आणि स्थानिकांनी त्यांना बर्फाच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जम्मू आणि काश्मिरात गेल्या चार दिवसांपासून हिमवृष्टी सुरू आहे.
काश्मीर खोऱ्यातील डोंगरी भागात प्रशासनाने हिमस्खलनाचा इशारा दिला आहे. हिमवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे बनिहाल-रामबन सेक्टरमध्ये अनेक ठिकाणी हिमस्खलन आणि दरडी कोसळल्या. त्यामुळे महामार्ग वाहतूकयोग्य बनविण्याचे काम विस्कळीत झाले आहे, असे पोलिसांनी सांगितले. महामार्गावरील दरडी, बर्फ हटवून तो वाहतूकयोग्य बनविण्यासाठी बीआरओची पथके झटत आहेत, असेही त्यांनी सांगितले. तुफान हिमवृष्टीमुळे बुधवारी हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. हिमस्खलन बचाव पथकांनी (एआरटी) शहीद जवानांचे मृतदेह हुडकून काढले. (वृत्तसंस्था)
अशा घडल्या दुर्घटना
२५ रोजी सायंकाळी ५ वाजता गुरेझ खोऱ्यात महाझगुंड गावाजवळील लष्करी छावणीला हिमस्खलनाचा तडाखा बसला. यात तीन तंबू बर्फाखाली गाडले जाऊन सैनिक अडकले. छावणीतील इतर सैनिक आणि महाझगुंड गावातील लोकांनी तात्काळ मदतकार्य केल्यामुळे सहा सैनिकांचे प्राण वाचले.
दुर्दैवाने तीन सैनिकांना वाचविता येऊ शकले नाही. एआरटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी या सैनिकांचे मृतदेह बाहेर काढले. याचवेळी गुरेझच्या निरू भागाजवळ लष्कराचे गस्ती पथक हिमस्खलनाच्या तडाख्यात सापडून ११ सैनिक बर्फाखाली अडकले. यापैकी एकाही सैनिकाला वाचविता येऊ शकले नाही.

Web Title: Twenty-four people die in avalanches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.