पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मिदनापूर येथील सभेदरम्यान मंडप कोसळला, 20 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 02:37 PM2018-07-16T14:37:20+5:302018-07-16T14:59:28+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथील सभेदरम्यान अपघात झाला असून, मोदींची सभा सुरू असताना मंडप कोसळून झालेल्या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत.
कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथील सभेदरम्यान अपघात झाला असून, मोदींची सभा सुरू असताना मंडप कोसळून झालेल्या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, सभा आटोपल्यानंतर मोदींनी रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली.
#WATCH Moments after a portion of tent in PM Narendra Modi’s rally in Midnapore collapsed during his speech today. PM later met the injured in hospital. #WestBengalpic.twitter.com/NjvFY7d6Ay
— ANI (@ANI) July 16, 2018
पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी मंडप उभारण्यात आला होता. दरम्यान, मोदींचे भाषण सुरू असतानाच या मंडपाचा काही भाग सभेसाठी उपस्थित असलेल्यांवर कोसळला. या अपघातात सुमारे 20 जण जखमी झाले. सतत पाऊस पडत असल्याने मैदानातील माती ओली झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
#WATCH A portion of tent in PM Narendra Modi’s rally in Midnapore collapsed during his speech today. PM instructed the SPG personnel to look after the people and attend to the injured. PM later met those injured, in hospital. #WestBengalpic.twitter.com/yb1CFQaSSc
— ANI (@ANI) July 16, 2018
Several injured after a portion of tent in PM Narendra Modi’s rally in Midnapore collapsed during his speech today. PM later met the injured in hospital. #WestBengalpic.twitter.com/joSiEBKFoy
— ANI (@ANI) July 16, 2018