पनीरसेल्वम यांच्यासह 20 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
By admin | Published: February 14, 2017 04:03 PM2017-02-14T16:03:49+5:302017-02-14T16:10:21+5:30
अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यासह 20 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 14 - अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यासह 20 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी शशिकला यांना सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दोषी ठरविले. त्यानंतर काही तासातच शशिकला यांनी अण्णा द्रमुक पक्षातून मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यासह 20 नेत्यांची हकालपट्टी केली. यासंदर्भात अण्णा द्रमुक पक्षाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये सदस्य पक्षाविरोधात वागत असल्यामुळे त्यांच्यावर हकापट्टीची कारवाई करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. या निवेदनावर शशिकला यांची सही आहे.
निवेदनात मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यासह शालेय शिक्षणमंत्री पांडियाराजन, पक्षाचे प्रवक्ते पोनीयान, माजी मंत्री नथम.आर. विश्वनाथन, के. पी. मुनुसामी, राजेंद्र बालाजी, पी.मोहन, माजी आमदार के. थावसी, के.ए. जयपाल, एस.के. सेल्वम, व्ही. नीलाकंदन, के. अय्याप्पन, ओम शक्ती सेगर, मधुसुदनन यांची नावे आहेत. तसेच, ओ. पनीरसेल्वम यांना पाठिंबा देणा-या काही आमदार आणि खासदारांची नावे या निवेदनात आहेत.