Twin Tower पाडण्याच्या काही तास आधी बिल्डिंगमध्येच गाढ झोपला होता तरूण, त्यानंतर जे काही झालं ते...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 08:45 PM2022-08-28T20:45:43+5:302022-08-28T20:48:16+5:30

तरूण आत झोपलाय हे कसं समजलं... वाचा थरारक किस्सा

twin tower man found sleeping at time of demolition evacuation Noida then what happened read more | Twin Tower पाडण्याच्या काही तास आधी बिल्डिंगमध्येच गाढ झोपला होता तरूण, त्यानंतर जे काही झालं ते...

Twin Tower पाडण्याच्या काही तास आधी बिल्डिंगमध्येच गाढ झोपला होता तरूण, त्यानंतर जे काही झालं ते...

Next

Twin Tower Demolition: नोएडामध्ये सुपरटेकने बांधलेले ट्विन टॉवर आज जमीनदोस्त झाले. हा टॉवर पाडण्यासाठी महिनाभरापूर्वीच प्रशासनाने अत्यंत काळजीपूर्वक नियोजन केले होते. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आजूबाजूच्या सोसायटीत राहणाऱ्या सर्व लोकांना तेथून सुरक्षित स्थळी आधीच हलवले होते. शुक्रवारी, २६ ऑगस्टपासूनच लोकांनी सोसायटी सोडण्यास सुरुवात केली होती. प्रशासनाने इतक्या तत्परतेने सर्व लोकांना बाहेर काढले, पण तरीही अपार्टमेंटमध्ये एक व्यक्ती मात्र गाढ झोपेत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. टॉवर रिकामा करायचा होता पण त्या व्यक्तीला याची पर्वा नव्हती असे सांगण्यात आले आहे. नक्की काय घडले आणि पुढे काय झाले... जाणून घ्या सविस्तर

नोएडामधील ट्विन टॉवर २८ ऑगस्टला, रविवारी पाडण्यात आले. ते पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने वर्षभरापूर्वी दिले होते. ते बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याने न्यायालयाने ते पाडण्याचे आदेश दिले. एमराल्ड कोर्टमध्ये एकूण १५ निवासी टॉवर आणि प्रत्येक टॉवरमध्ये ४४ अपार्टमेंट होत्या. या ठिकाणी सुमारे २५०० रहिवासी आणि १२०० वाहने होती. टॉवर्स पाडण्यासाठी विशेष दल तयार करण्यात आले. या टीममध्ये सोसायटीचेही सात सदस्य होते. याशिवाय प्रत्येक टॉवरसाठी एक कॅप्टनही करण्यात आला होता. इतके नियोजन करूनही एक इसम बिल्डिंगमध्येच झोपून होता.

अजूनही एक माणूस बिल्डिंगमध्येच आहे हे कसं समजलं?

टीमने टॉवरमधील अपार्टमेंटमधील सर्व रहिवाशांना हलवले होते. या समितीच्या प्रयत्नांमुळे सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व १५ निवासी टॉवरमधून लहान मुले व वृद्धांनाही बाहेर काढण्यात आले. एमराल्ड कोर्टचे गौरव मेहरोत्रा ​​या पथकाचे नेतृत्व करत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार टॉवरमध्ये कोणीही नव्हते. पण, सकाळी सातच्या आधी सुरक्षा रक्षकाने कर्मचाऱ्यांना अशी माहिती दिली, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सुरक्षा रक्षकाने सांगितले की, वरच्या मजल्यावर एक व्यक्ती गाढ झोपेत आहे. त्यानंतर या पथकाने टॉवरची पुन्हा तपासणी केली.

विशेष पथकाने अपार्टमेंटमध्ये जाऊन पाहिले असता एक व्यक्ती खरंच गाढ झोपेत असल्याचे दिसून आले. विशेष टास्क फोर्सचे सदस्य नरेश केशवानी म्हणाले, "टॉवर रिकामे करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून आम्ही दुसऱ्यांदा अपार्टमेंट तपासले. त्यावेळी ही व्यक्ती झोपलेली आढळली. तो टॉवर रिकामा करण्याची अंतिम मुदत विसरला होता. त्याने सांगितले की कसे तरी सुरक्षा रक्षकाने त्याला उठवले आणि ७ वाजण्याच्या सुमारास टॉवरच्या बाहेर आणले. त्यांनी सांगितले की आम्ही या योजनेवर महिनाभर काम करत होतो. या योजनेअंतर्गतच आम्ही अपार्टमेंटची दुहेरी तपासणी करण्याचे नियोजन केले होते. त्यामुळेच या इसमाचा जीव वाचला आणि अनर्थ टळला.

Web Title: twin tower man found sleeping at time of demolition evacuation Noida then what happened read more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.