एअर इंडिया लघुशंका प्रकरणात नवा ट्विस्ट! 'महिलेने स्वतःच्या सीटवर लघुशंका केली', आरोपीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 05:23 PM2023-01-13T17:23:38+5:302023-01-13T17:23:46+5:30
गेल्या काही दिवसापूर्वी एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये एका प्रवाश्याने सहप्रवाशावर लघुशंका केल्याचे प्रकरण समोर आले होते.
गेल्या काही दिवसापूर्वी एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये एका प्रवाश्याने सहप्रवाशावर लघुशंका केल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी एक आरोपीला अटक केली आहे, आरोपीला सद्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीने जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे, या प्रकरणी आज सुनावणी झाली.
एअर इंडियाच्या विमानात लघुशंका केल्याचे प्रकरण आता न्यायालयात सुरू असून, आरोपी शंकर मिश्राला अटक केल्यानंतर न्यायालयात दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात येत आहे. आरोपी शंकर मिश्रा याने आज महिलेवर नवा आरोप केला. त्या महिलेने स्वतः लघुशंका केल्याचा आरोप शंकर मिश्रा या आरोपीने केला आहे.
विमानात लघुशंका केल्याच्या प्रकरणावर सुनावणी सुरू झाली. आज आरोपी शंकर मिश्रा यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला.'मी महिलेच्या सीटपर्यंत पोहोचणे शक्य नाही. कारण महिलेची सीट ब्लॉक होती, असा जबाब आरोपी मश्राने दिला आहे. त्या महिलेने स्वतः लघुशंका केली कारण त्यांना आजार आहे, असंही आरोपीने म्हटले.
यानंतर सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी फ्लाइटमध्ये प्रवासी एका बाजूने दुसऱ्या बाजूने जाणे अजिबात अशक्य नाही, अशी टिप्पणी केली. मी देखील फ्लाईटमध्ये प्रवास केला आहे आणि मला माहित आहे की कोणत्याही रांगेत बसलेली व्यक्ती इतर कोणत्याही सीटवर जाऊ शकते. यानंतर न्यायाधीशांनी फ्लाइटमधील सीटिंग डायग्राम विचारला.
संतापजनक! भांडी न धुतल्याने शिक्षिकेने विद्यार्थिनीला केली बेदम मारहाण, दाबला गळा
दिल्ली पोलिसांनी मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या त्या आदेशाला आव्हान दिले आहे. ज्यामध्ये कोर्टाने आरोपी शंकर मिश्रा याला कोठडी देण्यास नकार दिला होता. मिश्रा यांच्या 7 दिवसांची पोलीस कोठडी पोलिसांनी मागितली होती. शंकर मिश्रा यांच्यावर मद्यधुंद अवस्थेत दुसऱ्या सीटवर बसलेल्या महिलेजवळ लघउशंका केल्याचा आरोप आहे. चौकशीसाठी आणि प्रकरणाच्या तळापर्यंत पोहोचण्यासाठी आरोपींची कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.