ट्विटरने दिला एडिटचा पर्याय; व्हेरिफाईड यूझर्सनी स्क्रीनशॉट शेअर करुन दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 06:48 AM2022-10-30T06:48:45+5:302022-10-30T07:36:34+5:30

काही व्हेरिफाईड यूझर्सनी आपल्याला ही सुविधा उपलब्ध झाल्याबाबतची माहिती स्क्रीनशॉट शेअर करून दिली. 

Twitter gave the option to edit; Verified users shared the screenshot information | ट्विटरने दिला एडिटचा पर्याय; व्हेरिफाईड यूझर्सनी स्क्रीनशॉट शेअर करुन दिली माहिती

ट्विटरने दिला एडिटचा पर्याय; व्हेरिफाईड यूझर्सनी स्क्रीनशॉट शेअर करुन दिली माहिती

Next

न्यूयाॅर्क/नवी दिल्ली : साेशल मायक्राेब्लाॅगिंग प्लॅटफाॅर्म ‘ट्विटर’चे मालक बदलल्यानंतर कार्यपद्धतीतही बदल व्हायला सुरुवात झाली आहे. ट्विटरने भारतातील निवडक यूझर्सना एडिट बटनाची भेट दिली आहे. ट्विटरने एडिट बटन आपल्या फिचर्समध्ये जाेडले आहे. त्याचा वापर भारतातील व्हेरिफाईड यूझर्स करू शकतात. काही व्हेरिफाईड यूझर्सनी आपल्याला ही सुविधा उपलब्ध झाल्याबाबतची माहिती स्क्रीनशॉट शेअर करून दिली. 

सध्या आयफोनवरच?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एडिट ट्विटचा पर्याय सध्या आयफोन वापरणाऱ्या यूझर्सना मिळाला आहे. एडिट केलेल्या ट्विटच्या खाली एडिट कधी केले, याचा तपशील दिसेल. त्यावर क्लिक केल्यास संपूर्ण एडिट हिस्ट्री पाहता येईल.

 

Web Title: Twitter gave the option to edit; Verified users shared the screenshot information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.