हॅकर्सनी लिहिलं 'आय लव्ह पाकिस्तान'; अनुपम खेर, राम माधव यांचं ट्विटर अकाउंट हॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2018 03:13 PM2018-02-06T15:13:53+5:302018-02-06T15:15:53+5:30
राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) अध्यक्ष अनुपम खेर, भाजपाचे सरचिटणीस राम माधव, राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांचं ट्विटर अकाउंट आज अचानक हॅक
राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) अध्यक्ष अनुपम खेर, भाजपाचे सरचिटणीस राम माधव, राज्यसभा खासदार स्वपन दासगुप्ता यांचं ट्विटर अकाउंट आज अचानक हॅक झालं आहे. अकाउंट हॅक झाल्याचं समजल्यानंतर ट्विटरने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या तिघांचंही अकाउंट सस्पेंड केलं आहे.
अनुपम खेर यांनी स्वतःच याबाबतची माहिती दिली. 'माझं ट्विटर अकाउंट हॅक झालं आहे. मी सध्या लॉस एंजेलिसमध्ये आहे, भारतातील माझ्या काही मित्रांकडून मला याबाबत समजलंय, ट्विटरला याबाबत मी कळवलं आहे' असं वृत्तसंस्था एएनआयसोबत बोलताना अनुपम खेर म्हणाले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॅकर्सनी स्वतःला तुर्की येथील असल्याचं म्हटलं आहे. तुमचं अकाउंट तुर्की येथील 'सायबर आर्मी आयदिस तिम' द्वारा हॅक करण्यात आलं आहे. तुमचा महत्वाचा सर्व डेटा आम्ही मिळवला आहे असं ट्विट हॅकर्सनी त्यांच्या अकाउंटवरून केलं. पण ट्विटच्या अखेरीस 'आय लव्ह पाकिस्तान' असं लिहिण्यात आलं आहे, तसंच ट्वीट्समध्ये तुर्कीचा झेंडा आणि बंदूक पकडलेले दहशतवादी मिसाइल दिसत आहेत.
My Twitter account has been hacked. Just got few calls from friends in India about it. I am in Los Angeles and it is 1 am. Have spoken to Twitter already,: Anupam Kher to ANI (File Pic) pic.twitter.com/4XVblxwKYb
— ANI (@ANI) February 6, 2018