Twitter: वाद वाढणार! ट्विटरने RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 01:38 PM2021-06-05T13:38:56+5:302021-06-05T13:40:53+5:30

Twitter: ट्विटरने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवली आहे.

twitter removes blue badge of rss chief mohan bhagwat account after venkaiah naidu | Twitter: वाद वाढणार! ट्विटरने RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवली

Twitter: वाद वाढणार! ट्विटरने RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवली

Next
ठळक मुद्देट्विटरने RSS सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवली मोहन भागवत यांच्यासह संघाच्या अनेक बड्या नेत्यांच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवलीकेंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हे

नवी दिल्ली: केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हे आहेत. ट्विटरकडून केल्या जात असलेल्या कारवाईचा निषेध करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरील ब्ल्यू टिक हटवल्यानंतर आता ट्विटरने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अकाऊंटची ब्ल्यू टिक हटवली आहे. (twitter removes blue badge of rss chief mohan bhagwat account)

ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या पर्सनल अकाऊंटला असलेली ब्लू टिक काढली होती. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. दोन तासांनतर ट्विटरने आपली चूक सुधारली आणि नायडूंचे पर्सनल अकाऊंट व्हेरिफाईड करण्यात आले आहे. त्यामुळे ब्लू टिक पुन्हा दिसू लागली. यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अकाऊंटवरील ब्ल्यू टिक हटवण्यात आली आहे. 

भाजपमधील कलह वाढला! दिलीप घोष यांना कार्यकर्त्यांनी घेरले; बैठकीत गोंधळ

एकही ट्विट नाही?

सहा महिने अधिक कालावधीपासून अकाऊंटमध्ये लॉगइन केले नाही, तर ब्ल्यू टिक हटवण्याविषयीच्या धोरणाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मोहन भागवत यांचे मे २०१९ मध्ये ट्विटरवर अकाऊंट ओपन करण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्या अकाऊंटवर एकही ट्विट दिसत नसल्याचे सांगितले जात आहे. मोहन भागवत यांच्यासह संघाच्या अनेक बड्या नेत्यांच्या अकाऊंटवरील ब्ल्यू टिक हटवण्यात आली असून, अकाऊंट्स अनव्हेरिफाइड करण्यात आले आहेत. यामध्ये सुरेश सोनी, भय्याजी जोशी आणि अरुण कुमार यांसारऱ्या बड्या नेत्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. 

गुजरातमध्ये १५ जूनपासून लागू होणार ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा; १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद

दरम्यान, व्यंकय्या नायडूंचे ट्विटर अकाऊंट जुलै २०२० पासून सक्रिय नव्हते. आमच्या व्हेरिफिकेशन धोरणानुसार, अकाऊंट सक्रिय नसल्यास ब्ल्यू टिक आणि व्हेरिफाईट स्टेटस काढले जाऊ शकते. मात्र आता ब्ल्यू टिक परत देण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण ट्विटच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आले आहे. व्यंकय्या नायडूंच्या पर्सनल अकाऊंटला असलेली ब्लू टिक काढण्यात आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. उपराष्ट्रपतींसह संघाच्या नेत्यांच्या अकाऊंटला असलेली ब्लू टिक ट्विटरने हटवल्यानंतर बऱ्याच जणांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी ट्विटरवर शाब्दिक हल्ले चढवले. 
 

Read in English

Web Title: twitter removes blue badge of rss chief mohan bhagwat account after venkaiah naidu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.