...म्हणून आम्ही व्यंकय्या नायडूंचं अकाऊंट Unverified केलं; ट्विटरनं कारण सांगितलं; चूक सुधारली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 11:06 AM2021-06-05T11:06:59+5:302021-06-05T11:12:29+5:30

ट्विटरकडून नायडूंच्या अकाऊंटला पुन्हा ब्लू टिक; स्पष्टीकरणही दिलं

Twitter restores blue tick on Vice President Venkaiah Naidus personal account | ...म्हणून आम्ही व्यंकय्या नायडूंचं अकाऊंट Unverified केलं; ट्विटरनं कारण सांगितलं; चूक सुधारली

...म्हणून आम्ही व्यंकय्या नायडूंचं अकाऊंट Unverified केलं; ट्विटरनं कारण सांगितलं; चूक सुधारली

Next

नवी दिल्ली: ट्विटरनं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या पर्सनल अकाऊंटला असलेली ब्लू टिक काढली होती. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. आता ट्विटरनं आपली चूक सुधारली आहे. नायडूंचं पर्सनल अकाऊंट व्हेरिफाईड करण्यात आलं आहे. त्यामुळे ब्लू टिक पुन्हा दिसू लागली. ट्विटरनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही बड्या नेत्यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिकदेखील काढली आहे. 

व्यंकय्या नायडूंच्या पर्सनल अकाऊंटला असलेली ब्लू टिक काढण्यात आल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी ट्विटरवर शाब्दिक हल्ले चढवले. यानंतर ट्विटरनं स्पष्टीकरण दिलं. बऱ्याच कालावधीपासून अकाऊंट लॉग इन न केल्यानं ब्लू टिक हटवल्याचं ट्विटरनं सांगितलं. चूक सुधारली जाईल, असं आश्वासन ट्विटरकडून देण्यात आलं. त्यानंतर थोड्याच वेळात नायडूंचं अकाऊंट व्हेरिफाईड करण्यात आलं.





'व्यंकय्या नायडूंचं ट्विटर अकाऊंट जुलै २०२० पासून सक्रिय नव्हतं. माझ्या व्हेरिफिकेशन धोरणानुसार, अकाऊंट सक्रिय नसल्यास ब्लू टिक आणि व्हेरिफाईट स्टेटस काढलं जाऊ शकतं. मात्र आता ब्लू टिक परत देण्यात आलं आहे,' असं स्पष्टीकरण ट्विटच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आलं आहे.




उपराष्ट्रपतींसह संघाच्या नेत्यांच्या अकाऊंटला असलेली ब्लू टिक ट्विटरनं हटवल्यानंतर बऱ्याच जणांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयानंदेखील याबद्दल नाराजी व्यक्त केली. ब्लू टिक का हटवण्यात आलं यामागचं कारण स्पष्ट करा, असं सरकारनं ट्विटरला सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वीच सरकार आणि ट्विटरमध्ये टूलकिटवरून जुंपली. त्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान नियमांवरून संघर्ष झाला. काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी ट्विटर इंडियाच्या दिल्ली आणि गुरुग्रामधील कार्यालयांवर छापे टाकले.

Web Title: Twitter restores blue tick on Vice President Venkaiah Naidus personal account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.