जम्मू- काश्मीरमध्ये अफवा पसरविणाऱ्या 'या' 8 ट्विटर अकाऊंटवर केंद्र सरकारची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 02:49 PM2019-08-13T14:49:57+5:302019-08-13T14:54:40+5:30

जम्मू- काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर सोमवारी ईदच्या निमित्ताने ट्विटरच्या सहाय्याने विविध खोट्या अफवा पसरविल्या जात होत्या.

twitter told to take down handles spreading fake news about kashmir valley, know how are they | जम्मू- काश्मीरमध्ये अफवा पसरविणाऱ्या 'या' 8 ट्विटर अकाऊंटवर केंद्र सरकारची कारवाई

जम्मू- काश्मीरमध्ये अफवा पसरविणाऱ्या 'या' 8 ट्विटर अकाऊंटवर केंद्र सरकारची कारवाई

googlenewsNext

नवी दिल्ली: जम्मू- काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर सोमवारी ईदच्या निमित्ताने ट्विटरच्या सहाय्याने विविध खोट्या अफवा पसरविल्या जात होत्या. त्यामुळे अशा अफवा पसरविणारे 8 ट्विटर अकाऊंट बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले असून आतापर्यत 4 ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे. 

जम्मू- काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर सोमवारी ईद शांततेत साजरी झाल्याचे दिसून आले. परंतु काही सामाजकंटकांनी ट्विटरद्वारे जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणेकडून गोळीबार करण्यात आल्याने त्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवली होती, मात्र जम्मू- काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कंसल यांनी काश्मीर खोऱ्यात बकरी ईद अगदी शांततापूर्ण वातावरणात साजरी झाली असून अशी कोणतीच घटना घडली नसल्याचे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले. त्यामुळे अशी अफवा पसरविणाऱ्या 8 ट्विटर अकाऊंट बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. तसेच या अकाऊंट पैकी 4 अकाऊंट आतापर्यत बंद करण्यात आले आहे.

यामध्ये या 8 ट्विटर अकाऊंटचा समावेश आहे.

@kashmir787

@Red4Kashmir

@arsched

@mscully94

@sageelaniii(बंद)

@sadaf2k19(बंद)

@RiazKha61370907(बंद) 

@RiazKha723(बंद)

 

Web Title: twitter told to take down handles spreading fake news about kashmir valley, know how are they

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.