'सुनो केजरीवाल... सुनो योगी'; नरेंद्र मोदींच्या आरोपांनंतर ट्विटरवर योगी-केजरीवाल यांच्यात खडाजंगी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 10:27 AM2022-02-08T10:27:59+5:302022-02-08T10:32:10+5:30
twitter war between yogi adityanath and arvind kejriwal : सोमवारी रात्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची (UP Assembly Election 2022) सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. सोमवारी रात्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. या ट्विटला अरविंद केजरीवाल यांनीही योगी आदित्यनाथ यांना प्रत्युत्तर दिले. सुनो केजरीवाल म्हणणाऱ्या योगी आदित्यनाथ यांना सुनो योगी असं म्हणत अरविंद केजरीवालांनी उत्तर दिले.
दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या लाटेत स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारवर निशाणा साधला. याला प्रत्युत्तर देत अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीने पंतप्रधानांचा दावा खोटा असल्याचे सांगितले. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले की, "पंतप्रधानांचे हे विधान पूर्णपणे खोटे आहे. देशाला आशा आहे की ज्यांना कोरोनाच्या काळात वेदना सहन कराव्या लागल्या, ज्यांनी आपले प्रियजन गमावले, पंतप्रधान त्यांच्याबद्दल संवेदनशील असतील. जनतेचे दुःख. राजकारण करणे पंतप्रधानांना शोभत नाही."
केजरीवाल को झूठ बोलने में महारथ हासिल है।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) February 7, 2022
जब पूरा देश आदरणीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में कोरोना जैसी वैश्विक महामारी से जूझ रहा था तब केजरीवाल ने प्रवासी मजदूरों को दिल्ली से बाहर का रास्ता दिखा दिया।
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याचा निषेध केला. योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत, "आदरणीय पंतप्रधानांबद्दल अरविंद केजरीवाल यांचे आजचे वक्तव्य अत्यंत निषेधार्ह आहे. अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी," असे म्हटले आहे. या ट्विटनंतर योगींनी आणखी एक ट्विट केले. "केजरीवाल ऐका, जेव्हा संपूर्ण मानवता करोनाच्या वेदना सहन करत होती, त्यावेळी तुम्ही उत्तर प्रदेशच्या लोकांना दिल्ली सोडण्यास भाग पाडले. तुमच्या सरकारने मध्यरात्री उत्तर प्रदेश सीमेवर लहान मुलांना आणि महिलांनाही असहाय्य सोडण्यासारखे अमानुष कृत्य केले. तुम्हाला मानवविरोधी म्हणावे की…"असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
बिजली-पानी का कनेक्शन काटा व सोते हुए लोगों को उठा-उठा कर बसों से यूपी बॉर्डर पर भेजा गया। अनाउंसमेंट कर कहा गया कि आनंद विहार के लिए बसें जा रही हैं, उससे आगे यूपी-बिहार के लिए बसें मिलेंगी।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) February 7, 2022
यूपी सरकार ने प्रवासी मजदूरों के लिए बसों का इंतजाम किया और उन्हें सुरक्षित वापस लाई।
तिसऱ्या ट्विटमध्ये योगी आदित्यनाथ यांनी, "वीज-पाणी कनेक्शन तोडण्यात आले आणि झोपलेल्या लोकांना उचलून बसमधून उत्तर प्रदेश सीमेवर पाठवण्यात आले. आनंद विहारसाठी बसेस जात आहेत, त्यापलीकडे उत्तर प्रदेश-बिहारसाठी बसेस उपलब्ध होतील, अशी घोषणा करण्यात आली. उत्तर प्रदेश सरकारने स्थलांतरित मजुरांसाठी बसेसची व्यवस्था केली आणि त्यांना सुखरूप परत आणले. केजरीवाल यांना खोटं बोलण्याची हातोटी आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश करोनासारख्या जागतिक महामारीशी झुंज देत असताना केजरीवाल यांनी स्थलांतरित मजुरांना दिल्लीतून बाहेरचा रस्ता दाखवला," असे म्हटले आहे.
सुनो योगी,
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 7, 2022
आप तो रहने ही दो। जिस तरह UP के लोगों की लाशें नदी में बह रहीं थीं और आप करोड़ों रुपए खर्च करके Times मैगज़ीन में अपनी झूठी वाह वाही के विज्ञापन दे रहे थे। आप जैसा निर्दयी और क्रूर शासक मैंने नहीं देखा। https://t.co/qxcs2w60lG
योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटला अरविंद केजरीवाल यांनीही प्रत्युत्तर दिले. सुनो केजरीवाल म्हणणाऱ्या योगी आदित्यनाथ यांना सुनो योगी असं म्हणत अरविंद केजरीवालांनी उत्तर दिले. अरविंद केजरीवाल यांनी ट्विटची सुरुवात सुनो योगींनी केली. "ऐका योगी, तुम्ही राहू द्या. उत्तर प्रदेशातील लोकांचे मृतदेह नदीत वाहत होते आणि तुम्ही करोडो रुपये खर्च करून टाईम्स मासिकात तुमच्या खोट्या जाहिराती देत होता. तुमच्यासारखा निर्दयी आणि क्रूर शासक मी पाहिला नाही", असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
प्रधानमंत्री जी का ये बयान सरासर झूठ है। देश उम्मीद करता है कि जिन लोगों ने कोरोना काल की पीड़ा को सहा, जिन लोगों ने अपनों को खोया, प्रधानमंत्री जी उनके प्रति संवेदनशील होंगे। लोगों की पीड़ा पर राजनीति करना प्रधानमंत्री जी को शोभा नहीं देता। pic.twitter.com/Dd4NsRNGCY
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) February 7, 2022