बंगळुरूत एअर शोदरम्यान मोठी दुर्घटना, दोन सूर्यकिरण विमानांची धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 12:22 PM2019-02-19T12:22:03+5:302019-02-19T12:38:20+5:30
बंगळुरूत हवाई दलानं एअर शोचं आयोजन केलं आहे.
बंगळुरू- बंगळुरूत हवाई दलानं एअर शोचं आयोजन केलं आहे. या एअर शोला गालबोट लागलं आहे. एअर शोदरम्यान प्रात्यक्षिक सादर करताना दोन सूर्यकिरण विमानं एकमेकांना धडकली. या अपघातात वैमानिकांनी प्रसंगावधान राखलं, ते पॅराशूटच्या मदतीनं जमिनीवर उतरल्यानं सुखरूप बचावले आहेत. येलाहांका एअर बेसवर दोन सूर्यकिरण विमानं कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली असून, विमानांचं किती नुकसान झालं हे अद्याप समजलेलं नाही.
Visual: Two aircraft of the Surya Kiran Aerobatics Team crash at the Yelahanka airbase in Bengaluru. More details awaited. pic.twitter.com/fmLcxBAuxm
— ANI (@ANI) February 19, 2019
#WATCH Two aircraft of the Surya Kiran Aerobatics Team crash at the Yelahanka airbase in Bengaluru, during rehearsal for #AeroIndia2019. More details awaited. pic.twitter.com/kX0V5O0n6R
— ANI (@ANI) February 19, 2019
विशेष म्हणजे दोन्ही विमानं हवेत असतानाच त्यांची एकमेकांशी टक्कर झाली. अपघातादरम्यान दोन्ही वैमानिकांना सुरक्षितरीत्या बाहेर येण्यात यश आलं. दोन्ही वैमानिकांवर सध्या उपचार सुरू आहेत. एअर इंडिया शोचा थरार 20 ते 24 फेब्रुवारीदरम्यान बंगळुरूत अनुभवता येणार आहे. त्याच्या एक दिवस आधी प्रात्यक्षिक सादर करत असतानाच या विमानांचा अपघात झाला.