"साहेब! घर मिळालं, आता बायकोही मिळवून द्या!", अडीच फुटांच्या मोहम्मद शरीफ यांची लग्नासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 01:52 PM2022-11-30T13:52:45+5:302022-11-30T13:53:27+5:30

सामूहिक लग्न सोहळ्यादरम्यान आपलेही लग्न पार पाडण्याची विनंती मोहम्मद शरीफ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

two and half feet long mohammad sharif begs for his wedding before raebareli DM | "साहेब! घर मिळालं, आता बायकोही मिळवून द्या!", अडीच फुटांच्या मोहम्मद शरीफ यांची लग्नासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती!

"साहेब! घर मिळालं, आता बायकोही मिळवून द्या!", अडीच फुटांच्या मोहम्मद शरीफ यांची लग्नासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती!

googlenewsNext

रायबरेली :  शामली येथील अडीच फूट उंची असलेल्या अजीम मन्सूरी यांचे थाटामाटात लग्न झाल्यानंतर आता रायबरेली येथील मोहम्मद शरीफ यांनीही लग्नाची  इच्छा व्यक्त केली आहे. अडीच फुटांच्या मोहम्मद शरीफ यांनी शासकीय घर मिळाल्यानंतर आता पत्नी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडे विनंती केली आहे. सामूहिक लग्न सोहळ्यादरम्यान आपलेही लग्न पार पाडण्याची विनंती मोहम्मद शरीफ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

रायबरेलीच्या महाराजगंज तहसीलमधील रहिवासी असलेले मोहम्मद शरीफ यांचा शारीरिक विकास होऊ शकला नाही. ते 40 वर्षांचे आहेत. वयाची चाळीशी गाठल्यानंतरही त्यांची उंची अवघी अडीच फूट आहे. दरम्यान, कुटुंबीयांनी त्यांना कोणतेही काम न केल्यामुळे घरातून हाकलून दिले, तेव्हा मोहम्मद शरीफ यांनी प्रशासनाला राहण्यासाठी घर देण्याची विनंती केली होती. जिल्हा प्रशासनाने मोहम्मद शरीफ यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर दिले, मात्र येथे त्यांना एकटेपणा जाणवू लागला. हा एकटेपणा दूर करण्यासाठी शरीफ यांनी पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनावर विश्वास व्यक्त करत जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले आहे.

शारीरिकदृष्ट्या अविकसित असल्याने काम करण्यास असमर्थ असल्याचे सांगत मोहम्मद शरीफ यांनी जिल्हा प्रशासनाकडे दाद मागितली. नातेवाईक किंवा ओळखीचे लोक यांच्याकडून कसे तरी पोट भरण्याची व्यवस्था मोहम्मद शरीफ करतात. पण, आता त्यांनी आता जिल्हा प्रशासनाला पोट भरण्यासाठी रोटीसोबत रोटी बनवणारी पत्नी द्यावी, अशी विनंती केली आहे. मोहम्मद शरीफ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन केले आहे की, विविध शासकीय योजनांमधून आर्थिक मदतीसह विवाह करण्यात यावा.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी मोहम्मद शरीफ यांचा अर्ज एडीएम प्रशासनाकडे सोपवला आणि त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. मोहम्मद शरीफ यांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे सरकारने दिलेले पंतप्रधानांचे निवासस्थान आहे, ज्यामध्ये ते एकटे राहतात. घरातील एकटेपणामुळे वेळ जात नाही आणि घरात स्वयंपाकाची व्यवस्था नाही. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांकडे लग्न लावण्याची मागणी होत आहे. आपल्या लग्नाची अनोखी मागणी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेल्या मोहम्मद शरीफ यांचे विनंती पत्र घेणारे अधिकारी राजेंद्र शुक्ला यांनी सांगितले की, त्यांनी लग्न करण्यासाठी विनंती पत्र दिले आहे, ते दाखवले जात आहे.

7 नोव्हेंबरला झाले अझीम मन्सूरी यांचे लग्न
शामली येथील अडीच फूट उंची असलेले अजीम मन्सूरी यांची अखेर लग्नाची प्रतीक्षा संपली आहे. अजीम मन्सूरी यांचा विवाह 7 नोव्हेंबरला झाला. अजीम मन्सूरी हे गेल्या अनेक वर्षांपासून लग्नासाठी पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारत होते.अजीम मन्सूरी हे शामली जिल्ह्यातील कैराना येथील रहिवासी असून माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचेही मोठे चाहते आहेत. 2019 मध्ये अखिलेश यादव यांच्या भेटीदरम्यान अजीम मन्सूरी प्रसिद्धीच्या झोतात आले होते. यानंतर 2021 मध्ये त्यांनी लग्नाची मागणी करण्यासाठी अनेकवेळा शामली कोतवाली, महिला पोलीस ठाणे आणि कैराना पोलीस स्टेशन गाठले होते.

Web Title: two and half feet long mohammad sharif begs for his wedding before raebareli DM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.