अडीच तास चालली विजयी मिरवणूक जल्लोष : ढोल, ताशांच्या गजरात थिरकले कार्यकर्ते; सभागृहात फेट्यांनी वेधले लक्ष

By admin | Published: March 11, 2016 12:28 AM2016-03-11T00:28:11+5:302016-03-11T00:28:11+5:30

जळगाव : महापौरपदी नितीन ल‹ा व उपमहापौरपदी ललित कोल्हे यांची निवड होताच त्यांची मनपा सतरा मजली इमारतीपासून उघड्या जीपवरून ढोल ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आली. सुमारे अडीच तास ही विजयी मिरवणूक चालली.

Two-and-a-half-hour winning congratulations: drum and thunderstorm activists; Attacks in the House | अडीच तास चालली विजयी मिरवणूक जल्लोष : ढोल, ताशांच्या गजरात थिरकले कार्यकर्ते; सभागृहात फेट्यांनी वेधले लक्ष

अडीच तास चालली विजयी मिरवणूक जल्लोष : ढोल, ताशांच्या गजरात थिरकले कार्यकर्ते; सभागृहात फेट्यांनी वेधले लक्ष

Next
गाव : महापौरपदी नितीन ल‹ा व उपमहापौरपदी ललित कोल्हे यांची निवड होताच त्यांची मनपा सतरा मजली इमारतीपासून उघड्या जीपवरून ढोल ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आली. सुमारे अडीच तास ही विजयी मिरवणूक चालली.
निवडणूक सुरू असतानाच मनपा सतरा मजली इमारतीच्या आवारात मोठ्या संख्येने खाविआ व मनसेचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी जमले होते. ढोल-ताशा पथकही सज्ज होते. फटाक्यांच्या लडही तयार ठेवण्यात आल्या होत्या. ल‹ा व कोल्हे यांची निवड निि›त होताच अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. त्या पाठोपाठ ढोल-ताशांचा गजरही सुरू झाला.
दरम्यान नूतन महापौर व उपमहापौरांनी आपल्या दालनात जाऊन पदभार घेतला. त्यानंतर ते खाली आले. लिफ्टजवळच कार्यकर्ते वाट बघत उभे होते. त्यांनी लिफ्टपासूनच नूतन महापौर, उपमहापौरांना उचलून खांद्यावर घेतले व मनपाच्या आवारातच उभ्या उघड्या जीपमध्ये उभे केले. तेथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. मनपाच्या प्रवेशद्वारापर्यंत आल्यावर नूतन महापौर, उपमहापौरांनी गाडीतून उतरून गोलाणीतील शिवसेना कार्यालयास सदिच्छा भेट दिली. नवीपेठेतून ही विजयी मिरवणूक इच्छापूर्ती गणेश मंदिरापर्यंत गेली. तेथून तायडे गल्लीत शरद तायडे यांच्या निवासस्थानापर्यंत मिरवणूक गेली. नूतन पदाधिकार्‍यांचे नगरसेविका ज्योती तायडे यांनी औक्षण करून स्वागत केले. मित्रपरिवारानेही यावेळी नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करीत शुभेच्छा दिल्या.
-------- इन्फो---
महापौरांनी स्वखर्चाने घेतली नवी गाडी(फोटो-१२५)
महापौरपदी निवड होणार हे स्पष्ट होताच नितीन ल‹ा यांनी स्वखर्चाने महापौरपदाला शोभेसी चारचाकीगाडी खरेदी केली. त्यावर महापौर मनपा जळगाव, असा बोर्डही लावण्यात आला आहे. गुरुवारी महापौर निवडीनंतर निघालेल्या विजयी मिरवणुकीसोबतच ही गाडीही लक्ष वेधून घेत होती.
-------- इन्फो---
चोख बंदोबस्त
निवडणुकीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कार्यकर्त्यांच्या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी मनपात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सभागृहात आधीपासून बसलेल्या कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना पीठासीन अधिकार्‍यांनी सभा सुरू होण्यापूर्वी सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. त्यांना सभा आटोपण्यापूर्वी आत येण्यापासून रोखण्यासाठीही मनपा कर्मचारी सभागृहाच्या प्रवेशद्वारावर तैनात केले होते.
-------- इन्फो---
सहलीवरून नगरसेवक परतले पहाटे
खाविआने राष्ट्रवादीच्या ८ नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्याच अन्य ३ पदाधिकार्‍यांना सहलीवर पाठविले होते. आधी गोव्याला गेल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात हे नगरसेवक टेम्पो ट्रॅव्हलरने पुण्याला गेले. तेथे खाविआ व मनसेच्या पदाधिकार्‍यांच्या मित्राच्या गेस्ट हाऊसवर काही दिवस तर लोणावळा येथील गेस्ट हाऊसवर काही दिवस मुक्काम केला. तेथून परिसरात लोणावळ, खंडाळा, सहारा सिटी, इमॅजिका आदी ठिकाणी या नगरसेवकांनी भटकंती केली. पुण्यात अजित पवार यांची भेट घेण्यासाठी दोन दिवस वाट बघितली मात्र भेट होऊ शकली नाही. गुरुवारी महापौर निवडणुकीच्या दिवशी सकाळी ६ वाजता हे नगरसेवक जळगावात परतले. घरी जाऊन परत साडेनऊ वाजता दूध फेडरेशनजवळील पेट्रोलपंपाजवळ जमले. तेथून गटनेते सुरेश सोनवणे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक माजीआमदारसुरेशदादा जैन यांच्या ७, शिवाजीनगर या निवासस्थानी पोहोचले. तेथेच मनसे, जनक्रांती तसेच खाविआचेही सर्व नगरसेवक जमले. त्यांना फेटे बांधण्याचीही व्यवस्था केलेली होती. सर्व ५८ नगरसेवक जमल्यावर पाच-सहा वाहनांमधून एकाच वेळी हे सदस्य पावणे अकरा वाजेच्या सुमारास मनपात पोहोचून सभागृहात दाखल झाले.

Web Title: Two-and-a-half-hour winning congratulations: drum and thunderstorm activists; Attacks in the House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.