दोन प्रभागांमध्ये सापड्या आणखी अडीच हजार मालमत्ता महापालिका: प्रभाग क्र मांक चार मध्ये ५५० मालमत्ता
By admin | Published: October 10, 2015 06:02 PM2015-10-10T18:02:59+5:302015-10-10T18:09:44+5:30
जळगाव- मनपा प्रभाग समिती क्र.१ व ४ च्या प्रभाग अधिकार्यांनी सुरू केलेल्या मोहिमेत करआकारणी न झालेल्या नव्या १ हजार मालमत्ता आढळून आल्या होत्या़ त्यात आणखी अडीच हजार मालमत्तांची भर पडली असून कर आकारणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू असून नवीन मालमत्तांची भर पडत आहे. मात्र मनपा दप्तरी नोंद असलेल्या व मालमत्ताकराची आकारणी होत असलेल्या मालमत्तांची संख्या होत असलेल्या बांधकामांच्या तुलनेत वाढलेली नाही. यामुळे प्रभाग समिती १ व ४ च्या प्रभाग अधिकार्यांनी नवीन मालमत्तांची शोध मोहीम हाती घेतली आहे़ त्यात जवळपास अडीच हजार नवीन मालमत्ता आढळून आल्या आहेत़ लवकरच त्यांचा शोध घेऊन कर वसुली केली जाईल, अशी माहिती प्रभाग अधिकारी व्ही़ओ़ सोनवणी व संजय नेमाडे यांनी सांगितले़ याअगोदर या शोध मोहिमेअंतर्गत एक हजार कर न भरलेल्या मालमत्ता आढळून आल्या होत्या़
आढळून आल्या ५५० मालमत्ता
प्रभाग अभियंत्यांनी हाती घेतलेल्या शोध मोहितेंतर्गत प्रभाग चार मध्ये पाचशे पन्नास मालमत्ता आढळून आल्या आहेत़ आतापर्यंत ३ हजार ५०० मालमत्तांचा शोध घेण्यात आला असून त्याअंतर्गत मनपाला दरमहा तीन ते चार कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होऊ शकते असा अंदाज व्यक्त होत आहे़