जम्मू काश्मीरमध्ये कारवाईदरम्यान दहशतवाद्यांनी केला स्फोट, दोन जवान शहीद, चार जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 03:02 PM2023-05-05T15:02:45+5:302023-05-05T15:04:48+5:30

जम्मू काश्मीरमध्ये आज दहशतवाद्यांनी हल्ला केला.

two army jawan killed four injured in blast rajouri jammu kashmir | जम्मू काश्मीरमध्ये कारवाईदरम्यान दहशतवाद्यांनी केला स्फोट, दोन जवान शहीद, चार जखमी

जम्मू काश्मीरमध्ये कारवाईदरम्यान दहशतवाद्यांनी केला स्फोट, दोन जवान शहीद, चार जखमी

googlenewsNext

जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे दहशतवादी कारवाईदरम्यान लष्कराचे दोन जवान शहीद झाले. शुक्रवारी, ५ मे रोजी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यादरम्यान दहशतवाद्यांच्या स्फोटात दोन जवान शहीद झाले. चार जखमींमध्ये तीन जवान आणि एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेण्यात आले. परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी कारवाई सुरू आहे. जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

ही घटना जम्मू भागातील भाटा धुरियन येथील तोटा गली भागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजौरी सेक्टरच्या कंडी जंगलात दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल विशेष माहिती मिळाली होती. यावर लष्कराने ३ मे रोजी संयुक्त कारवाई सुरू केली. ५ मे रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास शोध पथकाला गुहेत दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. 

मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाला अनुपस्थित विद्यार्थ्यांकडून १०० रुपये दंड

खराब हवामान आणि संततधार पावसात ही चकमक सुरू झाली. लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दहशतवाद्यांनी बॉम्बचा स्फोट केला. या हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह चार जवान जखमी झाले. जखमींना हेलिकॉप्टरने उधमपूर कमांड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. या कारवाईत काही दहशतवादीही मारले गेल्याचा अंदाज आहे.

दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी कारवाई सुरू आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोधमोहीम तीव्र केली आहे.

वृत्तानुसार, जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील वानीगम पायेन क्रेरी भागात गुरुवारी, ४ मे रोजी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले.

याआधी बुधवारीही दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. ते सीमेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करत होते. हे दोघेही स्थानिक दहशतवादी असून ते बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना लष्करशी संबंधित असल्याची माहिती मिळाली. शोपियान जिल्ह्यातील शाकीर माजिद नजर आणि हनान अहमद शेह अशी त्यांची नावे आहेत. 

Web Title: two army jawan killed four injured in blast rajouri jammu kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.