नागा बंडखोरांच्या घातपाती हल्ल्यात दोन जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 07:49 AM2018-06-18T07:49:01+5:302018-06-19T12:10:26+5:30
नागालॅंडमधील मोन जिल्ह्यात नागा बंडखोरांच्या घातपाती हल्ल्यात आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद झाले आहेत. तर आणखी चार जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या जवानांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कोहिमा : नागा बंडखोरांनी रविवारी केलेल्या हल्ल्यात आसाम रायफल्सच्या चार जवानांना वीरमरण आले असून, ६ जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. बंदी घालण्यात आलेल्या नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल आॅफ नागालँड (खापलांग) या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला.
नागालँडमध्ये बराच काळ या संघटनेचे लोक व सरकार यांच्यात वाद सुरू आहेत. सरकारने नागा बंडखोरांशी चर्चा बंद केली असून, नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल आॅफ नागालँड (खापलांग) संघटनेवर सरकारने बंदी घातली आहेत. या संघटनेचे काही बंडखोर अनेकदा म्यानमारमध्ये लपून बसतात आणि सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ले करीत असतात.
या नागा दहशतवाद्यांनी काल सुरक्षा रक्षकांच्या गाडीवर हल्ला केला. आसाम रायफल्सचे जवान पाणी आणण्यासाठी नदीजवळ गेले होते. ते नदीपाशी पोहाचेताच दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुरू केला आणि आणि ग्रेनड हल्लाही केला. तिथे जवळपास तासभर गोळीबार व बॉम्बस्फोटाचे आवाज ऐकू येत होते अशी माहिती स्थानिकांनी दिली. जिल्हा मुख्यालयापासून जवळपास ३० किमी दूर असलेल्या मोन जिल्ह्यातील अंबोई नगर येथील वस्तीजवळ ही घटना घडली. येथील स्थानिक लोकांनी सांगितले की, बंडखोर आणि जवान यांच्यात चकमक सुरु असताना गोळीबार आणि बॉम्बचा जवळपास एक तास मोठा आवाज येत होता.
Two Assam Rifles jawans lost their lives, four received injuries in an ambush by suspected National Socialist Council of Nagaland (NSCN-K) terrorists near Aboi town in Mon district, yesterday. #Nagalandpic.twitter.com/sLIUp8Fuxx
— ANI (@ANI) June 18, 2018
जखमींना आणले जोरहाटला
या हल्ल्याचे वृत्त कळताच, तेथून हेलिकॉप्टरच्या मदतीने जखमी जवानांना जोरहाट येथे आणले. तेथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नागालँडमध्ये पहिली बंडखोरी...
देशातील सर्वात पहिली बंडखोरी १९५० मध्ये नागालँडमध्ये सुरू झाली. त्यानंतर पुढच्या ३० वर्षांत भारतीय सैन्याने बंडखोरांविरुद्ध केलेल्या कारवाईमुळे या बंडखोरांना भारत सरकारशी वाटाघाटी करण्यास भाग पाडले. नागालँडमधील बंडखोरीला 'मदर ऑफ ऑल बंडखोरी' असे म्हटले जाते. स्वतंत्र ग्रेटर नागालँडची मागणी करण्यात येत होती. या ग्रेटर नागालँडमध्ये नागालँडसह अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मणिपूरही आहे. नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालॅंड (एनएससीएन) या नावाने बंडखोरांनी संघर्ष सुरू केला. पुढे या एनएससीएनचे अनेक गट तयार झाले.