बिहारमधून दोन बांग्लादेशी दहशतवाद्यांना अटक; पुलवामा हल्ल्याचे कागदपत्र जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 21:11 IST2019-03-25T20:40:40+5:302019-03-25T21:11:29+5:30
दोन्ही दहशतवादी बंदी घातलेल्या जमियत उल मुजाहिद्दीन बांग्लादेश आणि इस्लामिक स्टेट बांग्लादेशमध्ये सक्रीय आहेत.

बिहारमधून दोन बांग्लादेशी दहशतवाद्यांना अटक; पुलवामा हल्ल्याचे कागदपत्र जप्त
पटना : बिहारमधील पटना रेल्वे स्टेशन बाहेर संशयितरित्या फिरणाऱ्या दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक म्हणजे या बांग्लादेशी नागरिकांकडे पुलवामा हल्ल्यासंदर्भात कागदपत्र सापडले असून चौकशी वेळी दोघेही दहशतवादी संघटनांशी संबंधीत असल्याचे समोर आले आहे.
दोन्ही दहशतवादी बंदी घातलेल्या जमियत उल मुजाहिद्दीन बांग्लादेश आणि इस्लामिक स्टेट बांग्लादेशमध्ये सक्रीय आहेत. या संघटनांच्या अनेक सदस्यांना बांग्लादेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हे दोघेही बनावट पासपोर्टच्या आधारे बांग्लादेशची सीमा पार करून आले आहेत. तसेच बनावट भारतीय मतदान ओळखपत्र बनवून भारतात राहत होते. विविध शहरांमध्ये दहशतवादी संघटनेशी युवकांना जोडण्याच्या शोधात होते. तसेच बौद्ध धर्म स्थळांना लक्ष्य करण्यासाठी रेकी करत होते, असे चौकशी दरम्यान समोर आले आहे.
हे दोन्ही दहशतवादी गेल्या 11 दिवसांपासून गया शहरात राहत आहेत. तसेच सिरियाला जाऊन आयएसआयएस या दहशतवादी संघटनेला सहभागी होण्याच्या प्रयत्नात होते. त्यांच्याकडे पुलवामा हल्ल्यानंतर सैन्याने केलेल्या प्रतिनियुक्तीवरील आदेशांच्या प्रती, आयएसआयएस आणि अन्य दहशतवादी संघटनांचे पोस्टर, तीन मोबाईल फोन, मेमरी कार्ड, बनावट पॅन कार्ड आदी वस्तू जप्त करण्यात आले आहे. तसेच नवी दिल्ली ते हावडा, गया ते पटना आणि कोलकाता से गया रेल्वे प्रवासाचे तिकिट सापडले आहे.
Bihar: 2 suspected terrorists were arrested by ATS in Patna today. K Krishnan ADG, says "2 suspicious persons were apprehended today, during interrogation it was revealed that they were Bangladeshi citizens & affiliated to Jamiat-ul-Mujahideen. Incriminating material recovered." pic.twitter.com/ehvhdLCTUJ
— ANI (@ANI) March 25, 2019
खैरूल मंडल आणि अबू सुल्तान अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. ते बांग्लादेशातील चापातल्ला येथील रहिवाशी आहेत.