अभिमानास्पद! शहीद जवान औरंगजेबचे दोन भाऊ भारतीय लष्करात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 12:19 PM2019-07-23T12:19:42+5:302019-07-23T12:37:56+5:30
गतवर्षी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेला जवान औरंगजेब याचे भारतीय लष्करात दाखल झाले आहेत.
नवी दिल्ली - गतवर्षी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या औरंगजेब याचे दोन भाऊ मोहम्मद तारिक आणि मोहम्मद शब्बीर भारतीय लष्करात दाखल झाले आहेत. भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आम्ही लष्करात आलो आहोत, असे त्यांनी सांगितले.
गतवर्षी 14 जून रोजी ईदच्या सणासाठी घरी परतत असलेल्या औरंगजेबची दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती. 'आपला प्रदेश, देश वाचवण्यासाठी आणि भावाच्या हत्येचा बजला घेण्यासाठी आम्ही लष्करात दाखल झालो आहोत,' असे मोहम्मद शब्बीर याने प्रसारमाध्यमांना सांगितले.
J&K: Mohd Tariq & Mohd Shabbir, brothers of Army personnel Aurangzeb join Indian Army during Enrolment Parade of 100 New Recruits, today in Rajouri. Aurangzeb was abducted & later killed by terrorists, when he was on his way home on June 14, 2018. pic.twitter.com/KhZjow9N1k
— ANI (@ANI) July 22, 2019
'दहशतवाद्यांनी दगाफटका करून माझा मुलगा औरंगजेबची हत्या केली होती. जर त्याला लढताना वीरमरण आले असते तर मला त्याचे वाईट वाटले नसते. पण त्याला दगलबाजीने मारण्यात आले. मात्र आता माझे दोन्ही मुलगे लष्करात दाखल झाले आहेत, त्याचा मला अभिमान आहे. मात्र माझ्या मनात दु:खही आहे. त्यांनी माझ्या मुलाची हत्या केली त्यांच्याशी मी स्वत: लढावे, असे मला नेहमीच वाटते. मात्र आता माझे मुलगे औरंगजेबच्या हत्येचा बदला घेतील.
तर औरंगजेबचा लहान भाऊ मोहम्मद तारिक म्हणाला की, 'जसे माझ्या भावाने देशासाठी बलिदान दिले, आपल्या रेजिमेंटचे नाव उंचावले. तसेच आम्हीही चांगले काम करू . भावा प्रमाणेच आम्हीही देशासाठी प्राण देण्यास मागेपुढे पाहणार नाही. माझ्या भावाच्या हत्येचा बदला घेण्याची माझी इच्छा आहे. मी माझे आणि पंजाब रेजिमेंटचे नाव उंचावेन.'