छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात दोन जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 08:07 PM2018-07-09T20:07:24+5:302018-07-09T20:11:19+5:30
छत्तीसगडमधील कांकेर येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचे (आयईडी) साखळी स्फोट घडवून सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष केले. या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले आहेत.
Next
कांकेर : छत्तीसगडमधील कांकेर येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचे (आयईडी) साखळी स्फोट घडवून सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष केले. या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कांकेर येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. नक्षलविरोधी शोधमोहीम सुरु असताना ही घटना घडल्याचे समजते. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत.
Two BSF jawans lost their lives in an IED blast by Naxals in Kanker. #Chhattisgarh
— ANI (@ANI) July 9, 2018
दरम्यान, गेल्या एप्रिल महिन्यात छत्तीसगडमधील बिजापूर येथे सुरक्षा दलाने 7 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. जिल्ह्यामध्ये शोधमोहीम सुरू असताना सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. त्यावेळी 7 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. छत्तीसगड-तेलंगणाच्या सीमेवर ही चकमक घडल्याचे समोर आले होते.