छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत बीएसएफचे २ जवान शहीद

By admin | Published: March 12, 2016 09:45 AM2016-03-12T09:45:33+5:302016-03-12T09:45:57+5:30

छत्तीसगडच्या कान्केर जिल्ह्यात शनिवारी सकाळी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत बीएसएफचे २ जवान शहीद तर ४ जण जखमी झाले.

Two BSF jawans martyred in an encounter with the Naxals in Chhattisgarh | छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत बीएसएफचे २ जवान शहीद

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत बीएसएफचे २ जवान शहीद

Next
>ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. १२ - छत्तीसगडच्या कान्केर जिल्ह्यात शनिवारी सकाळी नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत बीएसएफचे (सीमा सुरक्षा दल) २ जवान शहीद झाले असून ४ जण जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, कन्केर जिल्ह्यातील बेचा गावाजवळील जंगलात नक्षलवादी लपल्याची माहिती मिळताच बीएसएफच्या जवान शोधमोहिम सुरू केली असता, नक्षलवाद्यांनी गोळीबार करत हल्ला चढवला. त्यात २ जवान शहीद झाले तर ४ जण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी रायपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
गेल्या महिन्याभरातील हा दुसरा मोठा हल्ला आहे. 
 

Web Title: Two BSF jawans martyred in an encounter with the Naxals in Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.