टायर पंक्चर झाल्याने मध्य सेनेगलमध्ये दोन बसची जोरदार टक्कर; ४० ठार, ७८ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 09:38 AM2023-01-09T09:38:03+5:302023-01-09T09:42:27+5:30
एका बसचा टायर पंक्चर झाल्याने बस अनियंत्रित होऊन दुसऱ्या बसला धडकली.
सेनेगल : टायर पंक्चर झाल्याने मध्य सेनेगलमध्ये दोन बसची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या भीषण अपघातात ४० जण ठार, तर ७८ जण जखमी झाल्याची घटना रविवारी मध्य सेनेगलमध्ये घडली.
सेनेगलच्या राष्ट्रीय अग्निशमन दलाचे प्रभारी कर्नल शेख फॉल यांनी सांगितले की, दोन बसमध्ये एकूण १२५ प्रवासी होते, त्यापैकी ४० जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर सर्व जखमींना केफरीन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष मॅकी सॅल यांनी दुर्घटनेमुळे देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, एका बसचा टायर पंक्चर झाल्याने बस अनियंत्रित होऊन दुसऱ्या बसला धडकली.