प्रशासकीय सेवा प्रशिक्षणासाठी दोन केंद्र उभारणार
By admin | Published: August 18, 2015 09:37 PM2015-08-18T21:37:11+5:302015-08-18T21:37:11+5:30
विष्णू सावरा : आदिवासी विद्यार्थी आयएएस होण्यासाठी प्रयत्न
Next
व ष्णू सावरा : आदिवासी विद्यार्थी आयएएस होण्यासाठी प्रयत्ननाशिक : सद्यस्थितीत मंत्रालयात एकही आदिवासी आयएएस अधिकारी नसल्याची खंत आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी व्यक्त केली. तसेच आदिवासी मुलांमधून प्रशासकीय सेवेत जास्तीत जास्त अधिकारी तयार होण्यासाठी राज्यात दोन ठिकाणी आदिवासी बांधवांसाठी प्रशासकीय सेवा प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सावरा यांनी दिली.हरसूल येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी कृती समितीच्या वतीने आयोजित आदिवासी बांधवांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. आदिवासी विकास विभागामार्फत अनेक योजना राबविल्या जातात, मात्र मागे वळून पाहिले तर एकही योजना आदिवासीपर्यंत पोहोचत नसल्याचे धक्कादायक चित्र गेल्या काही वर्षांत होते. ते बदलण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आदिवासी बांधवांपर्यंत विभागाच्या योजना योग्य प्रकारे पोहोचण्यासाठी तशी यंत्रणा हळूहळू तयार करावी लागेल, असे सावरा यांनी सांगितले.(प्रतिनिधी)