दोन मुख्यमंत्री, दोन प्रकरणे अन्...सोरेन आणि केजरीवाल यांच्या अटकेत एक साम्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 10:30 PM2024-03-22T22:30:07+5:302024-03-22T22:30:59+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सहा दिवसांच्या ईडी रिमांडवर पाठवले आहे.
Arvind Kejriwal Arrest : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने गुरुवारी(दि.21) सायंकाळी अटक केली. दिल्ली मद्य धोरणातील कथित मनी लॉड्रिंग प्रकरणात ही कारवाई झाली आहे. दरम्यान, आज त्यांना कोर्टासमोर हजर केले असता, राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने केजरीवालांना 6 दिवसांच्या ईडी रिमांडवर पाठवले आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यांना अटक होण्याची ही पहिलीच घटना नाही.
यापूर्वी 31 जानेवारी रोजी झारखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही झारखंडच्या रांचीमधून अटक करण्यात आले होते. या दोन्ही वेगळ्या घटना आहेत, पण यातील एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे, दोन्ही मुख्यमंत्र्यांना अंमलबजावणी संचालनालयानेच अटक केली आहे.
हेमंत सोरेन यांना का अटक झाली?
ईडीने मद्य घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री केजरीवाल यांना दहा समन्स बजावले होते. मुख्यमंत्री कोणत्याही समन्सवर हजर झाले नाहीत, त्यानंतर तपास यंत्रणेने त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई केली. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनादेखील ईडीने जमीन घोटाळ्याप्रकरणी दहा समन्स बजावले होते. तेदेखील चौकशीसाठी हजर झाले नाही, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. अटकेपूर्वी तपास यंत्रणेने सोरेन यांची सुमारे 8 तास चौकशी केली होती.