Video - रस्त्यावरुन जात होती २ लहान मुलं, अचानक कोसळलं घर; थरकाप उडवणारी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 10:34 AM2024-10-12T10:34:28+5:302024-10-12T10:44:34+5:30
मुलं रस्त्यावरून जात असतानाच घराचा पुढचा भाग कोसळून रस्त्यावर पडतो.
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक घर कोसळल्याचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून ती व्हायरल होत आहे. यामध्ये रस्त्यावरून काही लोक जात असल्याचं पाहायला मिळतं. तसेच दोन लहान मुलं देखील या रस्त्यावरून जाताना दिसत आहेत. आठ-नऊ वर्षांची ही मुलं आहेत.
मुलं रस्त्यावरून जात असतानाच घराचा पुढचा भाग कोसळून रस्त्यावर पडतो. मुलं तिथून थोडी पुढे आल्याने आणि अवघ्या काही सेकंदांच्या फरकाने सुदैवाने मुलांचा जीव वाचतो. मेरठच्या सदर बाजार पोलीस स्टेशन परिसरातील ढोलकी परिसरात ही घटना घडली आहे, जिथे सुमारे १०० ते १५० वर्षे जुन्या घराचा भाग कोसळल्याचं सांगण्यात येत आहे.
#मेरठ कैंट के ढोलकी मुहल्ले में अंग्रेजों के जमाने का एक मकान अचानक ढह गया
— Narendra Pratap (@hindipatrakar) October 11, 2024
एक महिला और 2 बच्चे बस कुछ सेकंड की दूरी पर थे. बाल बाल बच गए
मेरठ कैंट में 100 साल उम्र पा चुके ऐसे मकान ध्वस्त होने चाहिए लेकिन यह अभियान कैंट बोर्ड के भ्रष्टाचार का शिकार है pic.twitter.com/AWV4RJRxaj
ही संपूर्ण घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, घराचा काही भाग कोसळण्यापूर्वी दोन मुलंही रस्त्यावरून जात होती, घर कोसळल्याचा आवाज येताच दोन्ही मुलं पळत सुटली.
घर अत्यंत जुनं झालं असल्याचं सांगण्यात येत आहे. हे घर एका ट्रस्टचं असल्याची माहिती समोर आली आहे. कँटोन्मेंट बोर्डाने घर पाडण्यासाठी अनेकवेळा नोटिसा पाठवल्या होत्या. मात्र शुक्रवारी दुपारी हे घर कोसळल्याचंही सांगण्यात येत आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल आहे.