भारतीय हवाईहद्दीत घुसले दोन चिनी हेलिकॉप्टर्स
By Admin | Published: June 4, 2017 06:48 PM2017-06-04T18:48:51+5:302017-06-04T18:48:51+5:30
भारत-चीन सीमेजवळ असलेल्या उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील बाराहोतीमध्ये दोन चिनी हेलिकॉप्टर्स घुसले .
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - भारत-चीन सीमेजवळ असलेल्या उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील बाराहोतीमध्ये दोन चिनी हेलिकॉप्टर्स घुसले . भारत याप्रकरणाचा चीनकडे विरोध करणार आहे. गेल्या तीन महिन्यांत चिनी सैन्याची भारतीय हद्दीत घुसखोरीची ही चौथी घटना घडली आहे. याआधी चीनचे हेलिकॉप्टर्स भारतीय हद्दीत तब्बल साडेचार किमीपर्यंत आले होते. चीनचा दावा होता की ते त्यांच्याच हद्दीत होते.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही चॉपर जवळजवळ 5 मिनिटे भारतीय हद्दीत होते. त्यांनी भारतीय भूभागाची छायाचित्रे काढल्याची शक्यता आहे. निगराणी करण्याच्या हेतूनेही ते आले असावेत. पुढे बोलताना आधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत. दोन्ही हेलिकॉप्टरची ओळख पटली असून ते चीनच्या झिबा सिरीजचे अटॅक चॉपर आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षी 22 जून रोजी चिनी सैनिकांनी अरुणाचल प्रदेशाला लागून असलेल्या भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. जून महिन्यात घुसखोरीची तिसरी वेळ होती.