राजस्थानमध्ये रेल्वेचे दोन डबे घसरले; बराच वेळ वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 08:05 AM2024-01-06T08:05:53+5:302024-01-06T08:06:23+5:30
जोधपुर-भोपाल एक्सप्रेस ट्रेन भोपाळला जात होती. ही ट्रेन कोटा जंक्शनजवळ पोहोचली तेव्हा हा अपघात झाला.
राजस्थानमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा मोठा अपघात होता होता राहिला आहे. कोटा जंक्शनजवळ एका पॅसेंजर ट्रेनचे दोन डबे रुळावरून घसरले. यामुळे दोन्ही बाजुच्या ट्रेनची वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे अनेक ट्रेन डायव्हर्ट करण्यात आल्या.
वृत्तसंस्था एएनआयने याची माहिती दिली आहे. जोधपुर-भोपाल एक्सप्रेस ट्रेन भोपाळला जात होती. ही ट्रेन कोटा जंक्शनजवळ पोहोचली तेव्हा हा अपघात झाला. डबे घसरल्याने प्रवाशांना काहीशी दुखापत झाली आहे. परंतु, कोणी गंभीर जखमी किंवा मृत नाहीय.
ही ट्रेन शुक्रवारी सकाळी जवळपास १० वाजता जोदपूरहून निघाली होती. कोटाजवळ रेल्वेचे दोन डबे घसरले. यामुळे प्रवाशांमध्ये अफरातफरी माजली. जंक्शन जवळच असल्याने मदतही लवकर आली. रेल्वेच्या टीमने प्रवाशांना बाहेर काढले.
सकाळ होईपर्यंत रेल्वे ट्रॅक दुरुस्त करण्यात आला असून जोधपूर-भोपाळ रेल्वेलाही रवाना करण्यात आले आहे.